ShareChat
click to see wallet page
search
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 ११ डिसेंबर इ.स.१६६१ हेन्री रेव्हिंग्टनचा मृत्यू इ.स. १६६१ च्या मार्च महिन्यामध्ये शिवाजी महाराजांनी राजापूरची इंग्रजांची वखार लुटली आणि तिथल्या काही इंग्रजांना कैद केले. हे इंग्रज पुढीलप्रमाणे होते :- १) हेन्री रेव्हिंग्टन २) रँडॉल्फ टेलर ३) रॉबर्ट फेर्रान्ड ४) रिचर्ड नेपियर ५) रिचर्ड टेलर ६) फिलिप गिफर्ड ७) रॉबर्ट वार्ड नावाचा एक सर्जन ८) विल्यम मिंघम या आठ जणांपैकी पहिले सात लोक ईस्ट इंडिया कंपनीचे नोकर होते आणि आठव्याला ( विल्यम मिंघम ) या सात जणांनी आपल्या खाजगीतून पगार देऊन कामावर ठेवले होते . शिवाजी महाराज पन्हाळगडावर सिद्दी जौहरच्या कैदेत असताना या महाभागांनी ईस्ट इंडिया कंपनीची परवानगी न घेता इंग्रजी निशाणाखाली गडावर तोफा डागण्याचा जो 'उद्योग ' केला होता त्याचीच शिक्षा म्हणून महाराजांनी या सर्वाना कैद केले होते. यातील रिचर्ड नेपियर हा इंग्लंडहून आला तेव्हाच फार आजारी होता, आणि तो जगेल याची आशा नव्हती. अपेक्षे प्रमाणे तो मे १६६१ रोजी मराठयांच्या कैदेत असतानाच मरण पावला. त्यानंतर उरलेल्या कैद्यांना राजापुराहून वासोटा किल्ल्यावर आणि तिथून सोनगड किल्यावर हलवण्यात आले. ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरत येथील अधिकाऱ्यांनी कैदेतील आपल्या लोकांना सोडावे म्हणून शिवाजी महाराजांना काही पत्र लिहिली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. याच दरम्यान हेन्री रेव्हिंग्टन आजारी पडला. त्यामुळे त्याला रॉबर्ट वार्ड आणि विल्यम मिंघम या दोघांसोबत पॅरोलवर सोडण्यात आले. रेव्हिंग्टन कैदेतून सुटल्यावर या दोघांसोबत सुरत येथे गेला आणि अतिशय आजारी पडल्यामुळे ११ डिसेंबर १६६१ रोजी मरण पावला. बाकीच्या कैद्यांना कालांतराने रायरी ( रायगड ) येथे हलवण्यात आले. या कैद्यांनी रायरी येथून सुरत मधल्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार चालू ठेवला आणि आपली सुटका करण्याविषयी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जरा 'कडक' शब्दात सुनावले. त्यांचे हे खरमरीत पत्र पाहून चिडलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तेवढेच खरमरीत पत्र लिहून या उर्वरित कैद्यांना कळवले की , " तुम्ही आज तुरुंगात का खितपत पडला आहात ते तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे ! आपला धंदा करायचे सोडून, पन्हाळगडावर इंग्रजी निशाण नेऊन तोफा मारण्याचा फाजील उद्योग तुम्हाला कुणी सांगितला होता ? " असे खरमरीत पत्र लिहून कैदेत पडलेल्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल 📜 ११ डिसेंबर इ.स‌.१६६७ छत्रपती शिवाजी महाराजांकडून पोर्तुगिजांचा वकील यांनी तहाची कलमे शिक्कामोर्तब करून आणली, त्याची पोर्तुगिजांची नोंद...! "आपणाकडे जात असलेले आमचे वकील रेव्हरंड पाद्री गोंसालू मार्तीश, यांनी विजापुरच्या दरबारात आमचे वकील म्हणून पुर्वी काम केले आहे. ते हुषार असल्याने आपणाकडे आमचे वकील म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. ते तहाची कलमे आपल्या सहीसाठी आपणाबरोबर नेत आहेत. ते आपणाला जे काय विदित करतील त्यावर आपण विश्वास ठेवावा.' पोर्तुगिजांचा वकील रेव्हरंड पाद्री गोंसालू मार्तीश यांनी जी तहाची कलमे आपणाबरोबर नेली होती, ती त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिक्कामोर्तब करून आणली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ११ डिसेंबर इ.स.१६७६ कोल्हापूर परगण्यातील मुरगुडचे देसाई रुद्रप्पा नाईक यांना शिवाजी महाराजांनी पाठवलेले अस्सल आज्ञापत्र. रुद्रप्पाचा मुतालीक चेनप्पा हा शिवाजी महाराजांपाशी आला आणि त्याने सांगितले की, रुद्रप्पानी भुजबळगढीच्या कामाबद्दल नागडगौडा याला पाठवले असता त्याला त्या प्रांतातील एक बंडखोर तोरगळकर याने जीवे मारले. या सार्या घटनेबद्दल महाराजांच्या आणि स्वराज्याच्या सेवेत अंतर पडले म्हणून रुद्रप्पा अतिशय निराश झाले. हा सारा वृत्तांत ऐकून महाराजांनी त्यांना धीर दिला की तुम्ही साहेबकामास आपले इमान अर्पण केले आहे हे आम्ही जाणतो. त्यानुसार शके १५९८ च्या तुमच्या परगण्याचा पैसा (सरकारी हिस्सा) तुम्हाला भरण्याची गरज नाही. पण तुम्ही मात्र त्याप्रांतातील वरकड गनिमाने जी ठाणी घेतली असतील ती उठवून आपली ठाणी बसवणे. तुम्हाला आमच्याकडून सर्व मदत पुरवली जाईल. असे करून आपण यापुढेही आमची मर्जी संपादन कराल असे काम करून दाखवावे... हे पत्र दि. ११ डिसेंबर १६७६ असून पत्राच्या माथ्यावर महाराजांची ‘प्रतिपच्चंद्रलेखेव’ ही मुद्रा, पत्राच्या मायन्यात डाव्या कोनाड्यात ‘श्री शिवचरणी तत्पर, त्र्यंबकसूत मोरेश्वर’ ही मोरोपंत पेशव्यांची मुद्रा तसेच समाप्तीला ‘मर्यादेयं विराजते’ ही मर्यादा-मोर्तब आहे. पत्राच्या अखेरीस खुद्द महाराजांनी स्वहस्ते “लेखनसीमा” असे लिहीले आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ११ डिसेंबर इ.स.१६८३ शंभूराजांनी गोव्यावर चढाई केली. शंभू राजांच्या झंझावातामुळे फिरंग्यांनी आपली राजधानी मार्मा गोव्याला हलवली होती. आपल्या मातृभूमीला लागलेली हि कीड कायमची नष्ट करण्याचे छत्रपती शिवप्रभूंचे स्वप्न छत्रपती संभाजी राजे लवकरच साकार करणार यात आता कोणतीही शंका उरली नव्हती. आणि इतक्यात शहाजादा शहआलाम मोठ्या सैन्यानिशी तळ कोकणात दाखल होत असल्याची खबर येऊन धडकली आणि राजांना माघार घेणे भाग पडले. परततानाही शंभूराजांनी साष्टी आणि बारदेशवार एकाच वेळी हल्ले चढवले. ११ डिसेंबर ला मराठे मडगावाच्या चर्चमध्ये घुसले आणि प्रचंड लूट मिळवली. कुंकळी व असोळण्याच्या लोकांनी फिरंग्याना देतो तितका महसूल मराठ्यांना देण्याचे मान्य केले. १३ डिसेंबर १६८३ च्या अहवालात "पोर्तुगीज नावे निशाणी आणि ख्रिश्चन लोक गोव्यात शिल्लक ठेवणार नाही "असे शत्रूने (संभाजीराजांनी ) म्हणल्याचे व्हाइसरॉयने नमूद केले आहे. थिये किल्ल्यावर हल्ला चढवला आणि मराठ्यांनी किल्ल्याला पुरवठा होणारे पाणी दुषित केले. किल्ल्याची सर्व रसद तोडण्यात आली. जीव मुठीत धरून फिरंग्यानी माघार घेतली. साष्टी आणि बारदेशात तब्बल २६ दिवस मराठ्यांचे भगवे वादळ घोंगावत होते. या काळात मराठ्यांनी ४६ तोफा आणि प्रचंड खजिना लुटून घेतला 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ११ डिसेंबर इ.स.१७६७ पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर ह्याचा राज्याभिषेक सोहळा पार पडला....🙏🚩 पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांचे नाव दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांनी केलेल्या सामाजिक आणि धार्मिक कार्यामुळे त्यांना 'पुण्यश्लोक' म्हणतात. यांना जन्म १७२५ साली बीड जिल्ह्यातील चौंडी या छोट्याशा गावात झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहल्याबाईचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी- खंडेरावांशी झाले. खंडेराव हे व्यसनी, छंदीफंदी होते. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता. खंडेरावांपासून त्यांना मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या अशी दोन अपत्ये झाली. पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावल्यामुळे वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी त्यांना वैधव्याला सामोरे जावे लागले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये, हे राज्य सांभाळायचे आहे. आपल्या सासऱ्यांच्या इच्छेचा अहल्याबाई होळकरांनी मान राखला आणि सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले. मल्हारराव ज्या वेळी मोहिमेवर असत, तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखत असत. मल्हारराव होळकरांचे १७६६ मध्ये निधन झाले. आणि अहिल्याबाईवर फार मोठी जवाबदारी येऊन पडली. त्यांचा पुत्र मालेराव यांना जरी सुभेदारीची वस्त्रे मिळाली, तरी ती सांभाळण्याची त्यांच्यात कुवत नव्हती. लवकरच त्यांचे देहावसान झाले. १७६७ साली अहिल्याबाईचा राज्याभिषेक झाला. अहिल्याबाई आता खऱ्या अर्थाने राज्यकर्ती झाल्या. पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा अतिशय कुशलपणे चालवला. पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांच्या राज्यकारभाराचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांच्या काळातील राजकीय परिस्थितीचा आढावा घ्यावा लागेल. त्या काळात भारतातील राजकीय परिस्थिती फारच अस्थिर होती. भारतातील सर्वच संस्थाने आपले राज्य वाढविण्यासाठी आपापसात लढत होती. १७६१ ला पानिपतच्या दारुण पराभवामुळे मराठा राज्याचे फार नुकसान झाले होते. इंग्रज भारतात आपली सत्ता स्थापण्यासाठी आणि विस्तारासाठी प्रयत्नात होते.इंग्रजांनी १७५७ ला प्लासीची लढाई जिंकून बंगाल प्रांत आपल्या अधिपत्याखाली आणला. इंग्रजांनी १७६४ ला बक्सरचे युद्ध जिंकून पूर्वोत्तर भारतात आपली सत्ता स्थापित केली. पेशव्यांच्या भाऊबंदकीमुळे इंग्रजांनी दक्षिण भारतातपण आपले पाय पसरवायला सुरवात केली. जरी अहिल्याबाईंनी कोणत्याही मोठ्या युद्धात भाग घेतला नाही, तरी त्यांनी आपल्या राज्याचे रक्षण केले. भारतात प्रजेच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या एकही राज्य नव्हते. अश्या परिस्थितीत अहिल्याबाईंनी फक्त इंदुरलाच नाही तर संपूर्ण भारतात धार्मिक आणि सामाजिक कार्य केले. पुण्यश्लोक अहल्याबाई सुधारणावादी राज्यकर्ती होत्या पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली. राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्वरला हलविली. तिथे अनेक वास्तू बांधल्या. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला व पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. महेश्वर हे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. बाईंनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले, कोट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची वस्त्रे तयार होतील, अशी पेठ कायम केली. त्यांच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती. त्यामुळे त्यांचे नाव आसेतूहिमाचल घेतले जाते. त्यांनी अन्नछत्रे उघडली, राज्यात विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणान्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथस्थशाळा, आश्रयशाळा बांधल्या. गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत. थंडीच्या दिवसांत घोंगड्या वाटल्या जात. अहल्याबाईंनी अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. यांशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे-चार धामे या ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, कुंड, धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मागरिट म्हटले आहे. इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कॅधेरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ डेन्मार्कची राणी मागरिट यांच्याशी केली आहे. (इ.स. १७२५ - इ.स.१७९५ या राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स.१७९५) ही भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेले होते. त्या आधाराने अहिल्याबाईनी इ. स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले. पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर एक कुशल प्रशासक होत्या. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बाबतीत तज्ज्ञ राज्यकर्ताच कुशल प्रशासक होऊ शकतो. त्यांच्या राज्यात सुबत्ता, संपन्नता व शांती होती. त्यांनी संपूर्ण भारतात केलेल्या धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला. त्या काळी भारतात हिंदूंची आणि हिंदुधर्माची फार वाईट स्थिती होती. मुस्लिम राज्यकर्ते हिंदूंची देवळे तोडून त्यांना धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडत किंवा त्यांना मारून टाकत. फक्त अहल्याबाईंनीच हिंदू, हिंदुधर्म आणि हिंदूंच्या देवळांचे रक्षण केले. भारतात अनेक कर्तव्यवान स्त्रिया झाल्या, पण ज्या स्त्रियांनी युद्धे जिंकली फक्त त्यांचेच स्मरण केले जाते. अहल्याबाई होळकरांनी केलेल्या कामामुळेच त्या अजरामर झाल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ११ डिसेंबर इ.स.१७८३ रघुनाथराव पेशवा ह्यांचे निधन...💐💐 (त्यांची कार्यकिर्द : जन्म १ ऑगस्ट १७३४ ते मृत्यू११ डिसेंबर १७८३ अशी होती...) उत्तर पेशवाईतील अल्पकाळ सत्तेवर (१७७३) असलेला एक पेशवा. पहिला बाजीराव व काशीबाई यांचा हा दुसरा मुलगा असून तो राघो भरारी, राघोबा, दादासाहेब इ. नावांनीही ओळखला जातो. त्याचा जन्म माहुली (सातारा) येथे झाला. बालपण छ. शाहूंजवळ गेले. लहानपणी हा उनाड होता. १७५३ पासून तो स्वतंत्रतेने स्वाऱ्या काढू लागला. त्याची पहिली स्वारी १७५३ ते १७५५ पर्यंत चालली. तीत तो दिल्लीस गेला होता. या स्वारीत राजस्थानातून त्याने खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला. त्याची दुसरी स्वारीही दिल्लीवरतीच झाली; पण १७५७ मध्ये अब्दाली दिल्लीहून अफगाणिस्तानात परत गेल्यावर मग हा दिल्लीस पोहोचला. तेथून तो दिल्लीच्या उत्तरेकडील प्रदेश ताब्यात घेत घेत अटकपर्यंत पोहोचला व काही मराठे घोडदळाच्या तुकड्या तर पेशावरला जाऊन राहिल्या होत्या; पण हा काही कारण नसता १७५८ मध्ये पुण्यास परत आला. १७६० मध्ये भाऊसाहेब पानिपतमध्ये अडकले असता त्यांना साह्य करण्यासाठी बाळाजी बाजीराव राघोबास घेऊन उत्तरेत जात होता; तेव्हा राघोबास निजामाला मदतीस आणण्यासाठी दक्षिणेत पाठविले; पण निजामाचे मन वळविण्याचा कोणताच प्रयत्न न करता हा दक्षिणेत स्वस्थ बसून राहिला. थोरला माधवराव गादीवर आल्यावर (१७६१) राघोबाने पेशवेपद बळकाविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याला यश आले नाही; पण थोरल्या माधवरावाला हयातभर याने त्रास दिला. परिणामतः त्याने राघोबाला नजरकैदेत ठेवले. नारायणरावाच्या कारकीर्दीत त्याच्या पेशवेपद मिळविण्याच्या आकांक्षेने मोठीच उचल खाल्ली. नारायणरावाचा खून होण्यात त्याचे अंग होतेच. शेवटी त्यास काही महिने पेशवेपद मिळाले (१७७३). त्यात स्वार्थी हेतूने इंग्रजांनी त्यास मदत केली; तथापि बारभाईच्या कारस्थानामुळे त्याचे काहीएक न चालून शेवटी त्यास बारभाईस शरण यावे लागले. पुरंदरच्या तहानंतर (१७७६) उर्वरित जीवन त्याला कोपरगाव, आनंदवल्ली वगैरे ठिकाणी आणि इंग्रजांच्या आश्रयाखाली सुरत, मुंबई, भावनगर इ. ठिकाणी व्यतीत करावे लागले. कचेश्वर (कोपरगावजवळ) येथे किरकोळ आजाराने तो मरण पावला. रघुनाथरावाने एकूण तीन लग्ने केली. जानकीबाई (१७४२), आनंदीबाई (१७५५) आणि मथुराबाई (१७७९). या तिघींपैकी आनंदीबाई देखणी व महत्त्वाकांक्षी होती. जानकीबाई १७५५ मध्ये मरण पावली. आनंदीबाई १७९४ मध्ये मरण पावली. आनंदीबाईपासून दोन मुली व भास्कर, बाजीराव आणि चिमणाजी असे तीन मुलगे झाले. पण पहिला भास्कर हा लहानपणीच मरण पावल्याने त्याने अमृतराव नावाच्या एका मुलास दत्तक घेतले होते. बाजीराव व चिमणाजी हे त्यास नंतर झालेले मुलगे. त्याच्या बऱ्याच नाटकशाळा होत्या. रघुनाथरावाच्या ठिकाणी खास कर्तबगारी नव्हती; पण जबरदस्त महत्त्वाकांक्षा असल्यामुळे त्याचे पेशवाईत कोणाशीच पटले नाही. महत्त्वाकांक्षेच्या पायी त्याने इंग्रजांचीसुद्धा मदत घेतली, पण त्याच्या नाकर्तेपणामुळे त्याचा कोठेच जम बसला नाही. मराठी इतिहासात त्याला ‘कलिपुरुष’ हे नाव त्याच्या वादग्रस्त व्यक्तिमत्त्वामुळे प्राप्त झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ११ डिसेंबर इ.स.१८१७ दुसऱ्या बाजीरावाची पेशवे पदावरून हकालपट्टी "पेशवे हे राजे नव्हते" तर "छत्रपतींचे सेवक होते" आणि मुळात "दस्तुरखुद्द छत्रपतींनीच" "बाजीराव रघुनाथराव" यांना दिनांक ११ डिसेंबर सन १८१७ रोजी जाहिरनामा काढून "पेशवे" पदावरून दूर केले होते. खरेतर तेव्हांच बाजीराव रघुनाथराव एक सामान्य मराठे झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ११ डिसेंबर इ.स.१९१७ जव्हारचे लोकहित, कल्याणकारी मा. श्रीमंत राजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे साहेब यांचा जन्मदिन. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #⛳शिवसंस्कृती #🚩मी शिवबा भक्त
📜इतिहास शिवरायांचा - ILE GNET 3 T HNE 2R T ೦ [5 RE Al ARA- H शिवदिनविशेण SHIVDINVISHESH CREATFD BY Ranul Borse Patil ११ डिसेंबर इःस. १६८३ छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजेने साष्टी व बारदेश वर एकाच वेळी हल्ले चढवले. the qreat maratha warriors the qreat marathauarriors Ihe qreal maratho uarriors ILE GNET 3 T HNE 2R T ೦ [5 RE Al ARA- H शिवदिनविशेण SHIVDINVISHESH CREATFD BY Ranul Borse Patil ११ डिसेंबर इःस. १६८३ छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजेने साष्टी व बारदेश वर एकाच वेळी हल्ले चढवले. the qreat maratha warriors the qreat marathauarriors Ihe qreal maratho uarriors - ShareChat