#RAMDAS ATHAWALE #
कृपया प्रसिद्धीसाठी
दलित पँथर चे संस्थापक नेते दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका ढसाळ यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली.तसेच त्यांच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्र्या कडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी दिले. रिपब्लिकन पक्ष कायम मल्लिका ढसाळ यांच्या पाठीशी राहील असे सांगत ना. रामदास आठवले यांनी यावेळी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार वैजयंती कुलकर्णी; रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव; दलित पँथरचे नेते पडवळ;
रिपाइं अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष सोहेल शेख; तालुका अध्यक्ष सुनील पवार आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख ##Breakingnews #RAMDASATHAWALE #follow #🎭Whatsapp status


