ShareChat
click to see wallet page
search
(दालचिनीची पाने) जास्त वापर भारतीय जेवणात करतात. तसेच मसाल्यात याचा वापर केला जातो. तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत. या पानांचे तेलही काढले जाते. तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आढळून येते. याशिवाय पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलिनिअम यांचीही मात्रा अधिक आहे. दालचिनीची पाने जेवणाचा सुगंध वाढविण्यासाठी मदत करतात. खाद्यपदार्थांची चव वाढवणारा पदार्थ आहे. तमालपत्राचे गुणधर्म याप्रमाणे सांगितलेले आहेत. लघु, तिक्‍तोष्ण कफवातविषापहमर्शोहृल्लासारोचकापहं स्तकशोधने बस्तिकण्डूत्रिदोषघ्नम्‌ । … राजनिघण्टु, धन्वंतरिनिघण्टु चवीला कडू, वीर्याने उष्ण व लघू गुणाचे तमालपत्र त्रिदोषशमन, विशेषतः कफदोष व वातदोष कमी करते. मुखशुद्धी करून रुची उत्पन्न करते. तसेच तमालपत्र खाणे एक अत्यंत फायद्याचे आहे. औषधासाठी तमालपत्र तमालपत्राचा उपयोग पुढीलप्रमाणे करता येतो, 1. तुम्हाला अपचन होत असेल तर तमालपत्राचा उपयोग करा. पोटातील ज्या काही समस्या असतील तर तमालपत्रामुळे दूर होतात. चहामध्ये तमालपत्रचा वापर करा. कप, अॅसिडिटी, पित्त या समस्यातून तुम्हाला आराम मिळू शकतो. 2. तमालपत्राचा लाभ डायबिटीज रुग्णाला होता. सामान्य रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते. हा तमालपत्राचा प्रभाव सकारात्मक दिसून येत आहे. ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी तमालपत्राचे सेवन करणे गरजेचे आहे. ते त्यांना अधिक लाभदायक आहे. 3. तुम्हाला रात्री चांगली झोप हवी असेल तर तमालपत्राचे सेवन करा. त्यामुळे चांगली झोप येते. त्यासाठी तमालपत्राच्या तेलाचा उपयोग करा. काही थेंब पाण्यात टाकून ते पाणी प्राशन करावे. 4. तमालपत्राने किडनी स्टोन (मुतखडा) आणि किडनीसंबंधीत ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होतात. तमालपत्र पाण्यात टाकून पाणी उकळावे. उकळलेले पाणी थंड करुन पिणे. किडनी स्टोन, किडनीबाबतच्या समस्यांवर मात करता येते. 5. जर तुम्हाला वेदना होत असतील तर तमालपत्र हा त्यावर चांगला उपाय आहे. तमालपत्राच्या तेलाने मसाज केल्याने आराम मिळतो. डोके दुखत असेल. मान दुखत असेल तर तेलाने मसाज केल्याने त्याचा लाभ मिळतो. 6. मळमळ, अन्नसेवनाची इच्छा नसणे, मूळव्याध यांसारख्या पचनविकारांवर उपयुक्‍त असते, शरीरातील विषद्रव्यांचा नाश करते, खाज कमी करते, बस्ती अर्थात मूत्राशयासंबंधी रोगांवर उपयुक्‍त ठरते व डोक्‍याची शुद्धी करते. 7. तोंड चिकट होऊन खायची इच्छा होत नसल्यास, पोटात जडपणा जाणवत असल्यास दोन चमचे लिंबाचा रस, चार चिमूट सैंधव मीठ व पाव चमचा तमालपत्राचे चूर्ण एकत्र करून थोडे थोडे चाटल्यास फायदा होतो. 8. सर्दी झाल्याने नाक बंद पडले असता, डोके व डोळे जड झाले असता तमालपत्राचे बारीक चूर्ण नाकात फुंकले असता किंवा तपकिरीप्रमाणे नाकाने ओढले असता, एक-दोन शिंका येऊन नाक मोकळे व्हायला मदत मिळते. 9. गर्भाशयाची ताकद वाढवण्यासाठी तमालपत्र वापरतात. वारंवार गर्भपात होत असल्यास तमालपत्र, दालचिनी व अशोक यांचे चूर्ण घेतल्यास गर्भाशयाचे शैथिल्य दूर होऊन गर्भ टिकायला मदत मिळते. मात्र या तक्रारीसाठी मुख्यत्वे तज्ज्ञांचा सल्ला अवश्‍य घ्यावा. 10. स्वयंपाकात तमालपत्राचा वापर नियमित केल्यास अन्नपचनाला मदत मिळते, अन्नाचे शोषण व्यवस्थित होते. पोटात वायू होणे, मलावष्टंभ वगैरे त्रास होत नाहीत. 11. सुगंधामुळे व रुची वाढवण्याचा गुण असल्यामुळे व श्वसनसंस्थेवर कार्य करत असल्याने च्यवनप्राश, वासावलेह, कंटाकार्यावलेह वगैरे अनेक औषधांत तमालपत्र वापरले जाते. #मसाले
मसाले - ShareChat