#त्यावेळी मागून येणाऱ्या रुग्णवाहिकेनं त्यांना धडक दिली. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहिती असी की, ट्रकमधून एक कुटुंब प्रवास करत होतं. नाशिकला जाण्यासाठी ते ट्रकमध्ये बसले होते. दरम्यान वाटेत ट्रकचा अपघात झाला. या अपघातातून ते बचावले. ट्रकमधून उतरून ते रस्त्यावर थांबले होते. त्यांना समृद्धीवरून निघालेल्या रुग्णवाहिकेनं जोराची धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झालाय. तर काही जण जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्त ट्रक नाशिकच्या दिशेनं जात होता. तर ज्या रुग्णवाहिकेनं धडक दिली ती अहिल्यानगरला निघाली होती. ट्रकमधून उतरलेले लोक रस्त्यावर थांबले होते तेव्हा त्यांना रुग्णवाहिकेनं धडक दिली. या अपघातानंतर रस्त्यावर रक्तामांसाचा चिखल झाला होता.
मुंबईत बेस्टचा अपघात, ४ जणांचा मृत्यू
मुंबईत भांडुप परिसरात बेस्ट बसनं १४ जणांना चिरडल्याची घटना घडलीय. नगरदास नगरच्या दिशेनं जाणाऱ्या बसने चिरडल्यानं ४ जणांचा मृत्यू झालाय तर दहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. अपघातात मृत्यू #मराठी बातम्या #न्युज #बातम्या झालेल्यांमध्ये एका परिचारिकेसह तीन महिलांचा समावेश आहे. रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.


