#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स नाशिक–बडनेरा विशेषसह ५ गाड्या रद्द; प्रवाशांची मोठी गैरसोय
जलंब स्थानकावर पायाभूत सुविधा व देखभाल कामासाठी घेतलेल्या ब्लॉकमुळे आज भुसावळ रेल्वे विभागातील ५ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द झालेल्या गाड्यांमध्ये ६११०१ भुसावळ–बडनेरा मेमू, ६११०२ बडनेरा–भुसावळ मेमू, १११२१ भुसावळ–वर्धा एक्स्प्रेस, १११२२ वर्धा–भुसावळ एक्स्प्रेस आणि ०१२११ बडनेरा–नाशिक रोड विशेष गाडी यांचा समावेश आहे. यामुळे काही गाड्या उशिराने धावत असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. #नाशिक शहर

