ShareChat
click to see wallet page
search
#jay shankar maharaj . *शेज आरती* 🔥 ☘️🌹☘️🌹☘️🌹☘️🌹☘️ *आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधुता ।* *स्वामी अवधुता ।* *चिन्मय, सुखधामी जाऊनी, पहुडा एकांता ।।* *वैराग्याचा कुंचा घेऊनी चौक झाडीला ।* *गुरु हा चौक झाडीला ।।* *तयावरी सप्रेमाचा शिडकावा केला ।।१।।* *पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ती ।सुंदर नवविधा भक्ती ।।* *ज्ञानाच्या समया उजळुनी लाविल्या ज्योति ।।२।।* *भावार्थाचा मंचक ह्रदयाकाशीं टांगिला ।* *ह्रदयाकाशीं टांगिला ।।* *मनाची सुमनें करूनी केलें शेजेला ।।३।।* *द्वैताचे कपाट लोटुनी एकत्र केले ।* *गुरु हे एकत्र केले ।।* *दुर्बुध्दीच्या गांठी सोडुनी पडदे सोडीयले ।।४।।* *आशा तृष्णा कल्पनेचा सांडुनी* *गलबला ।गुरु हा सांडुनी गलबला ।।* *दया क्षमा शांती दासी उभ्या शेजेला ।।५।।* *अलक्ष उन्मनी घेउनी नाजुकसा शेला ।* *गुरु हा नाजुकसा शेला ।।* *निरजंनी सदगुरु माझा निजे शेजेला ।।६।।* ☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘ *!! श्री अवधूत चिनंतन श्री गूरू देव दत्त दत्त !!* *!! श्री तुळजा भवानी माता की जय !!* *!! श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!* *!! श्री सद्गगुरू शंकर बाबा महाराज की जय !!* *!! श्री बजरंग बली हनुमान की जय !!* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
jay shankar maharaj . - ShareChat