18 वर्षांची प्रतीक्षा संपली! अमेरिकेला धक्का देत 27 देशांसोबत भारताची ‘गेमचेंजर’ डील, एका सहीने अख्खा गेम पलटला
India and Europe Trade Agreement Highlights: जवळजवळ दोन दशकांच्या वाटाघाटींनंतर भारत आणि युरोपियन युनियनने अखेर ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (FTA) अंतिम केला आहे. जगातील सर्वात मोठ्या व्यापार करारांपैकी एक मानला जाणारा हा करार भारतीय वाहन बाजार आणि ग्राहकांना महत्त्वपूर्ण फायदे देतो. या करारामुळे युरोपियन कारवरील उच्च कर लक्षणीयरीत्या कमी होतात, ज्यामुळे भारतात लक्झरी वाहनांच्या किमती कमी होण्याचा मार्ग मोकळा होईल.