मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही अनेक पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचे अनुदान जमा झालेले नाही. हेल्पलाइन आणि ऑनलाइन तक्रारी करूनही मार्ग न निघाल्याने आता शासनाने त्रुटी दुरुस्तीची जबाबदारी थेट अंगणवाडी सेविकांवर सोपवलीय. जळगाव जिल्ह्यातच सुमारे एक लाख आठ हजार महिला या लाभापासून वंचित असून, त्यांच्या नावांच्या याद्या तालुकास्तरावरून अंगणवाडी सेविकांकडे पाठवण्यात आल्या आहेत. आधार, बँक खाते किंवा माहितीतील विसंगती दूर करण्याचे काम आता गावपातळीवर होणार आहे. प्रशासनाने संबंधित महिलांना घाबरून न जाता आपल्या भागातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले असून, त्रुटींची पूर्तता झाल्यावर प्रलंबित अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
#मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना 2024 #😍लाडक्या बहिणींना 2100 कधी; शिंदेंनी केलं जाहीर #माझी लाडकी बहीण योजना #मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना #📄सरकारी योजना
00:47

