#रतन टाटा🙏 नवल टाटा( २८ डिसेंबर १९३७~९ आँक्टोबर २०२४) हे एक भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष होते.रतन टाटा हे भारतातील आदरणीय आणि यशस्वी उद्योजग म्हणून ओळखले जातात. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष असलेले रतन टाटा यांनी त्यांच्या दुरदृष्ठी आणि कठोर परीश्रमाने या समूहाची जागतीक स्तरावर मोठी प्रतीष्ठा निर्माण केली.१९९०~२०१२ या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते आणि आँक्टोबर २०१६ ते फेब्रूवारी २०१७ या कालावधीत ते समूहाचे अंतरीम अध्यक्ष होते, तसेच त्पांच्पा चॅरीटेबल ट्रस्टचे नेतृत्व करत होते. भारताची आन, बान आणि शान असणारे कितीही मोठे झाल्यास पाय जमिनीवर रोवून कसे उभे रहावे याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे रतन टाटा.त्यांना पद्मविभूषण(२००८) आणि पद्मभूषण (२०००) या भारतातील दोन सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.*आज त्यांंची ८८ व्या जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली*


