जय हरी माऊली हो, 🙏🏻
सत नमो आदेश गुरुजी को आदेश
कुळधर्म आणि कुळाचाराचे महत्व
आपण कोण आहोत हे आपल्या कुलधर्म आणि कुळाचार ठरवतात. आपल्या पूर्वकर्मामुळे आपण एका विशिष्ट कुळात गोत्रात जन्म घेतो, प्रत्येक कुळाचे कुलदैवत असते याची माहिती असणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे.प्रत्येक कुळासाठी एक रक्षक देवता म्हणून गोत्र कार्य करत असते,प्रत्येक शुभकार्यात व पूजा विधि करताना गोत्र घेऊनच ती फळदायी केली जाते. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या कुळाचे गोत्र व कुलदैवत यात "कुलस्वामी व कुलस्वामिनी हे दोन्हीही ठाऊक असणे गरजेचे आहे आई शिवाय बाप अपूर्ण बापाशिवाय आई अपूर्ण आणि या दोघांशिवाय आपले कुळ अपूर्ण असते हे लक्षात घ्या" प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी कुलदेवतेची उपासना अत्यंत मदत करते कुलदैवत हे आयुष्यातील सर्व चढ उतारावर आणि कठीण प्रसंगात आपले रक्षण करते नित्य नियमाने कुलदेवतेची पूजा केल्यास संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो हे केवळ पूजापाठ नसून आपल्या पूर्वजांची साधना संस्कार आणि ऊर्जा आहेत. कुलदैवत हे नेहमी विषम संख्यात असणे गरजेचे आहे ५,७,९ किंवा ११ यात कुलस्वामी, कुलस्वामिनी, भैरव देवात नागधरण (दोन प्रकार एकटा आणि पत्नीसह), काळकाई देवी (महिषासुरी) व गोत्र (रक्षक देवता) याच पद्धतीत कुलाचार असावा. हेच वेदात व पुराणात, ग्रंथात आहेत. यात संपूर्ण माहिती आपण याच आधारावर देत असतो.
कुलधर्म म्हणजे :-
"आपल्या कुलदेवतेची उपासना व्रत नैवेद्य सण उत्सव आणि नियम."
कुलाचार म्हणजे :-
"घरात चालत आलेली परंपरा श्रद्धा वागणूक आणि आचार."
(टीप:- हल्ली प्रत्येक जण कुलाचार करताना अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कुलधर्म व कुलाचार करत आहे विशेष म्हणजे कुलदेवतेचा गोंधळ हा तिखट म्हणजेच मांसाहारी असताना तो कोणाच्याही सांगण्यावरून तो गोड करण्यात येतो त्यामुळे कुळाचार व कुलधर्म पूर्णपणे बदललेले जाते आणि आपल्या पूर्वजांनी तयार केलेली पद्धत नाकारात चुकीच्या पद्धतीने कुलाचार करतात त्यातून कुलदेवता ही क्रोधित होते त्यामुळे केलेला गोंधळ हा पूर्णपणे अपयशी होतो त्यातून कुलधर्माला कुलाचाराला व त्यातील सदस्यांना नाहक त्रास हळूहळू होऊ लागतो. हे पूर्णपणे सत्य आहे याचे अनेक अनुभव साधकाने व अनेक कुटुंबांना आलेले आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे चुकीचा कुलाचार न करता आपल्या पूर्वजांनी तयार केलेला कुलाचारच योग्य आहे त्याच पद्धतीने संपूर्ण कुळाचार पद्धत संस्कार उपासना चालू ठेवणे आवश्यक आहे.)
जेव्हा आपण कुलधर्म करतो तेव्हा काय होते. :-
"घरात शांतता येते अडचणी कमी होतात पिढ्यान पिढ्यांचे दोष क्षमतात, देवांचा व पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो."
कुलधर्म कुलाचार विसरल्यास काय होते. :-
"कारण नसताना त्रास वाढतो ना त्या दुरावा निर्माण होतो प्रगती घटते आजारपण निर्माण होतात नोकरी जाणे किंवा आर्थिक संकट तयार होते नैराश्य येते विवाहात अडचणी अपत्य सुखात अडचणी निर्माण होतात."
गोत्र एकूण चार वर्ण व सात गोत्र पद्धत आहे.
१) वर्ण :- क्षत्रिय गोत्र:- विश्वमित्र, जमदग्नी
शस्त्र :- ढाल तलवार
२) वर्ण :- सूर्यवंशी गोत्र :- वशिष्ठ, कश्यप
शस्त्र :- धनुष्यबाण
३) वर्ण :- अत्रि गोत्र :- अत्रि
शस्त्र :- त्रिशूल कमांडलू
४) वर्ण :- वैष्णव गोत्र :- भारद्वाज गौतम
शस्त्र :- काठी कमांडलू
यापैकी प्रत्येक कुळाचे एक गोत्र आहे आणि या गोत्रात आपले कुळाचे रक्षक आहेत.
कुलदैवत मोठे असो लहान,नियम साधे असो वा कठीण,निष्ठा आणि श्रद्धा महत्वाची आहे.
उपाय रोज सकाळ संध्याकाळ कुलदेवतांच्या नावाने दिवा लावणे नित्य ११,२१ किंवा १०८ वेळा कुलदेवत मंत्र नामजप/नामस्मरण करणे,नैवेद्य दाखवणे,मनापासून नमस्कार इतके केले तरी कुलदैवत प्रसन्न होतात.
"ज्याने आपला कुलधर्म जपला त्याच्या पाठीशी संपूर्ण कोण उभे राहते."
माऊली हो, मला आशा आहे की, लेख माहिती आपणास उपयुक्त ठरेल यातून आपल्या हातून योग्य कुळधर्म कुळाचार पार पडेल हीच कुलदेवते चरणी प्रार्थना..! संपूर्ण मार्गदर्शन हे सद्गुरू मुळे मिळाले हा संपूर्ण लेख सद्गुरू गुरू चरणी अर्पण..!
" नाथजी गुरुजी भली करे कुलदैवत सबकी भली करे"
"नमः शिवाय नमो चंडिकाय"
"दत्तगुरु नमो नवनाथाय"
"श्री स्वामी समर्थ जय शंकर"
अलख निरंजन 🔱🚩
आदेश 📿🙏🏻
#नाथलीला #AVP13 #नाथपरंपरा #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏भक्ती सुविचार📝 #🙏यळकोट यळकोट जय मल्हार
नाथसेवेकरी
अमित विकास पाटील
#🌻आध्यात्म 🙏


