ती नक्की येईल
ती नवकी येईल, पहाटेसारखी अलगद,
मनाच्या दारावर टकटक करीत.
जुन्या आठवणींची धूळ झटकत,
माझ्या शांततेत रंग भरित.
नजरेत तिच्या प्रश्न असतील,
ओठांवर उत्तरांची चाहूल.
माझ्या एकटेपणाशी हसत,
ती मोकळी करील काळजाची भूल.
#📝कविता / शायरी/ चारोळी #मराठी कविता #कविता #मराठी कविता चारोळ्या, शेर शायरी पण येताना थोडी उशीराने,
माझे काही शब्द थकलेले असतील.
तरीही आशेचा दिवा सांगेल,
ती नवकी येईल
आणि मी बदललेलो असेन.

