सोनं-चांदीचा स्वस्ताईला सांगावा, गुंतवणूकदारांना गुड न्यूज, ग्राहकांना टेन्शन! अमेरिकेतून बातमी येताच दरवाढ सुस्साट
Today Gold and Silver Rate December 17: गेल्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली असून बुधवारी भारतीय बाजार उघडताच दोन्ही मौलयवन धातूंच्या किमतींनी पुन्हा एकदा उच्चांकी झेप घेतली आहे. सोन्याचा दर दीड लाखांच्या पार उसळला आहे तर चांदीच्या किमतीत अचानक मोठी वाढ झाली. गेल्या अनेक दिवसांपासून चांदीत तेजी सुरू असून आता या तेजीने नवा उच्चांक गाठला.