महाराष्ट्राचे अत्यंत लाडके नेते, लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ह्यांच्या अचानक निधनाने महाराष्ट्र आज हळहळला. दिलखुलास आणि मिश्किल व्यक्तिमत्व, मनमोकळेपणाने बोलण्यात आपलासा वाटणारा ग्रामीण लहेजा, प्रशासनावर मजबूत पकड, काम करण्याची हातोटी, रोखठोक भूमिका, हो ला हो आणि नाही ला नाही म्हणणारा, तळागाळातील जनतेशी थेट नाळ जोडलेला, कणखर आणि तेवढाच हळव्या मनाचा, समर्पित भावनेने जनसेवा करणारा महाराष्ट्राचा खरा अजित दादा...
पहाटे पासून कामाला लागणारे पवार, वेळ पाळणारे दादा आज असे अवेळी गेले. मन हेलावून टाकणारी ही घटना. दादांनी आपल्याबोलीभाषेतून खेड्यातील संस्कृती परंपरा जपली. त्यांची सगळी भाषण मिश्किल स्वरूपाची, त्याला गावरान बाज असायचा. त्यांच्या डोक्यात सतत विकासाची चक्र चालू असायची. महाराष्ट्राच्या विकासासाठी ते नेहमी आक्रमक असत. ते नेहमी पत्रकारांना म्हणत असत विकासावरती प्रश्न विचारावे. फालतू प्रश्न विचारत बसू नका. विकासावरती बोला.
महाराष्ट्रातील मला आवडलेलं राजकारणातील एक विलक्षण व्यक्तिमत्व. दादांची काम करण्याची पद्धत, त्यांचा हजरजबाबीपणा, सर्वसामान्य माणसांशी थेट त्यांच्या भाषेत संवाद साधण्याची पद्धत, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये दादांचं असलेलं लक्ष. महाराष्ट्राने एक कणखर, शिस्तबद्ध, वक्तशीर आणि कार्यतत्पर नेतृत्व गमावले. दादा अशी प्रेमाची लाडकी महाराष्ट्रातील राजकारणातील ओळख. कार्यकर्त्यांना जपणारा नेता.
आज प्रत्येक गावातल्या घरातला माणूस रडतोय.
बारामतीचा विकासपुरुष...
पुणे, पिंपरी चिंचवडचे विकासाचे शिल्पकार अजितदादा पवार!!!
महाराष्ट्राच्या राजकारणातील कोहिनूर हिरा अजित दादा त्यांच्या सभेच्या भाषणामध्ये नेहमी हसवायचे, पण आज हसवता हसवता रडवून गेलात दादा. गेली 4 दशक राजकारणामध्ये झंझावातासारखे काम केले.
भावपूर्ण श्रद्धांजली दादा 🙏😥
#ajitpawar #राजकारण #🎭Whatsapp status #अजित पवार #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो
00:32

