ShareChat
click to see wallet page
search
॥माघ महात्म्य॥ १९ जानेवारी २०२६ पासून माघ महिना सुरू होत आहे. मघा या नक्षत्रामध्ये जेव्हा पौर्णिमेचा चंद्र असतो, त्या महिन्याला 'माघ' असे म्हणतात. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा व उपासना केली जाते. श्री. गणेश जेव्हा पृथ्वीवर प्रथम प्रकटले तो दिवस माघ शुक्ल चतुर्थीचा होता म्हणून या दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते आणि म्हणून गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला येतो. या महिन्याचे वैदिक नाव ते म्हणजे तपस् होय. तसेच पौष पौर्णिमेपासून माघ पौर्णिमेपर्यंत माघस्नान करण्याची पद्धत आहे. याच महिन्यात देवीची माघी गुप्त नवरात्र वा शामला नवरात्र असते. माघी पौर्णिमेस शनी मेषेत, गुरु व चंद्र सिंहेत आणि सूर्य श्रवण नक्षत्रात असल्यास तो महामाघी योग होतो. यादिवशी ‘श्री’ या बीजमंत्राचा जप करावा. प.बंगालमध्ये युगादी माघी पौर्णिमा ही तिथी नववर्षाची तिथी मानली जाते. हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेल भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरविले जातात. या महिन्यातील पौर्णिमेला चंद्र मघा नक्षत्राच्या सान्निध्यात असतो म्हणून या मराठी महिन्याला माघ महिना असे म्हणतात. माघ हा मराठी वर्षाच्या कालगणनेनुसार अकराव्या क्रमांकाचा महिना आहे. धार्मिक मान्यतेनुसार माघ महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. माघ महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा व उपासना केली जाते. श्री. गणेश जेव्हा पृथ्वीवर प्रथम प्रकटले तो दिवस माघ शुक्ल चतुर्थीचा होता म्हणून या दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते आणि म्हणून गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला येतो. या दिवशी श्री.गणेशाचा जन्मोत्सव साजरा करतात. चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती असलेला वरद विनायक या श्री.गणेशाच्या रूपाच्या जयंतीचा उत्सव या दिवशी साजरा केला जातो. या चतुर्थीला वरद चतुर्थी असे म्हटले जाते. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी गोरगरीबांना अन्नदान, तिळ दान, जप, व्रत, उपवास करून श्री गणेशाची उपासना करावी. ll श्रीकृष्णार्पणमस्तु॥ #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌺प्रथम तुला वंदितो🙏 #🌺गणपती बाप्पा मोरया✨
☀️गुड मॉर्निंग☀️ - श्री गणेश जर्यंती माघी गणेश जयंती दिनानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा बाप्पा आपणांस उदंड आयष्य देवी श्री गणेश जर्यंती माघी गणेश जयंती दिनानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा बाप्पा आपणांस उदंड आयष्य देवी - ShareChat