ShareChat
click to see wallet page
search
क्षण येतो क्षण जातो दिवसही संपतो वर्षही सरते सरत्या वर्षात काही अनुभव मिळाले येत्या वर्षात काही अनुभव मिळतील चिमणी पाखरे कालही उडत होते चिमणी पाखरे उद्याही उडतील स्वप्न साकार करण्याचे तर प्रत्येकजण प्रयत्न सतत करतील वापर करावा स्वतःच्या कलेचा वापर करावा स्वतःच्या कौशल्याचा कशाला हवी साथ उगाच चढाओढीचा आनंदी निरोप घेऊ देऊ वर्षाचा दिवस उगवणार मावळणार चक्र निसर्गाचे चालूच राहणार काही आठवणीत राहणार काही विसरुन जावे लागणार प्रत्येक क्षण येणारा हा नवीनच असतो स्वागत करू आनंदाने प्रत्येक क्षणाचे क्षण वाचावे आनंदाचे आणि उल्हासाचे तोरण बांधू नववर्षाच्या आगमनाचे. #kavita charoli