ऐ घालमोड्या दादा, तू आमचा कुणीबी नाही...
असं ठणकावत जेव्हा विद्रोही साहित्य संम्मेलनाची बीजं धारावीतल्या जमीनीत रोवली गेली होती, तेव्हा मी फार लहान होतो. माझा बाप पँथर एसएम प्रधानचे बोट पकडून मी ही त्या प्रवाहात सामील झालो होतो. बाबूराव बागूल, नामदेव ढसाळ, राजा ढाले, शांताबाई दाणी, ज वि पवार यांच्यासारख्या क्रांतिकारक साहित्यिक कार्यकर्त्यांच्या साथीनं मला बाबासाहेबांपर्यंत पोहोचता आले.
आज विद्रोही बोधीवृक्षात रुपांतरीत झाले आहे. या बोधीवृक्षाची मुळं इतकी घट्ट रूजली आहेत या मातीत की, ही सावली ओलांडून कुणालाच आता पुढे जाता येणार नाही. सांस्कृतिक राजकारणात विद्रोही हस्तक्षेप म्हणून सुरू झालेला विद्रोहीचा प्रवास आता संविधानवादी सामाजिक न्यायाच्या मजबूत राजकीय कृतीत परावर्तीत झालेला आहे.
यावर्षीचे विद्रोही साहित्य संम्मेलनाचा ऊलगुलान आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेल्या नांदेडच्या क्रांतीभूमीत होत आहे. पॅंथर एस.एम.प्रधान आणि नामांतर शहीद पोचीराम कांबळे, जनार्धन मवाडे, गौतम वाघमारे यांच्या भूमीत होणार असून
माझी या पर्वासाठी झालेली स्वागताध्यक्ष म्हणून निवड मी निश्चितच सार्थ ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. आज माझा बाप असता तर खूप खूष झाला असता. आम्ही दोघांनी एकत्रितपणे बाबासाहेबांसमोर हात जोडून त्यांचे आभार मानले असते. आपणा सर्वांना विद्रोही अन् क्रांतिकारी जय भीम करून अभिवादन केले असते.
विद्रोहीचा या वर्षीचा स्वागताध्यक्ष म्हणून मी आपणा सर्वांना नांदेडच्या लढवय्या भूमीत येण्याचे आवतन देतो आहे. तारीख आणि ठिकाण लवकरच आपणास कळवितो. लवकरच भेटूया!
सिंहाच्या छातीने,
वाघाच्या हिमतीने,
पँथरच्या वेगाने,
संविधानाचा जागर करत या...
विद्रोहीच्या या पर्वाला सर्वांनी वाजतगाजत या…
#युवा पँथर नांदेड, जय जोती, जय संविधान!!
- राहूल एस.एम. प्रधान
#नांदेड
#nanded #✍मराठी साहित्य #☸️जय भीम

