ओढ तुझी लागता
मन गेले मोहरून...
स्पर्श तुझा होताच
मन गेले बहरून....
स्पर्श तुझा अलवार
मनी गुलामोहर फुलतो...
स्पंदने ही घेत झोके
बेधुंद वाऱ्यांसवे झुलला...
पुन्हा पुन्हा उमजते
ही प्रीत वेड्या मनाची....
अलगद मिठीत विसावलेली
साथ लाभली जन्मांतरीची....
सुगंध ताजा आहे
श्वासात भिनलेला...
ओढ तुझी अशीच आहे
जसा निशिगंध फुललेला #❤️I Love You #🌹प्रेमरंग #💖रोमॅन्टीक Love #📝कविता / शायरी/ चारोळी #🥰प्रेम कविता📝 ....
सचिन माळी


