#शायर की डायरी हातात फक्त एक सलाईन आणि २४ तासांचा प्रवास... त्या बापाची जिद्द जिंकली!"
एक बाप आपल्या लेकरांसाठी जीवाच राणही करू शकतात.याचं जिवंत उदाहरण या पोस्टमद्ये आहे.
"साहेब, खिशात दमडी नाही... पण कसंही करून माझ्या मुलाला वाचवा!"
त्या बापाचे ते थरथरते शब्द आजही आठवले की अंगावर काटा येतो.
घटना २०१६ ची. ससून हॉस्पिटल, पुणे.
रात्र झाली होती. मी नुकताच एका सर्जरीतून बाहेर आलो होतो, तोच एका जोडप्याने मला गाठलं. त्यांची अवस्था बघूनच समजत होतं की त्यांनी खूप मोठा आणि कष्टाचा प्रवास केलाय.
ते नांदेडच्या एका खेड्यातून, तब्बल २४ तास ट्रेनचा प्रवास करून पुण्यापर्यंत आले होते. सोबत ४ वर्षाचा चिमुकला अथर्व.
हातात काय? तर फक्त एक सलाईनची बाटली.
त्या ट्रेनच्या गर्दीत, त्या एका सलाईनच्या भरवशावर त्या बापाने आपल्या मुलाचा जीव २४ तास टिकवून ठेवला होता.
परिस्थिती अत्यंत भयानक होती.
अथर्वचं पोट फुगलेलं. पल्स (Pulse) हाताला लागत नव्हती. आतडीला पीळ पडून आतला भाग काळा पडू लागला होता. शरीरातील विष वाढत होतं.
प्रत्येक मिनिटाला मृत्यू त्याच्या जवळ येत होता.
कागदपत्रं, पैसे, केस पेपर... कशाचीच वाट बघण्यासारखी परिस्थिती नव्हती.
माझ्या सहकारी भूलतज्ज्ञ डॉ. सुषमा म्हणाल्या, "फक्त रक्ताची सोय करा, बाकी आपण बघून घेऊ. टेबलवर घेऊया."
त्या रात्री ऑपरेशन थिएटरमध्ये फक्त एक सर्जरी झाली नाही, तर एका गरिबाच्या विश्वासाची लढाई आम्ही लढत होतो.
पोट उघडलं... आतडीचा खराब झालेला भाग काढला... आणि अथर्वला पुन्हा नवं आयुष्य मिळालं.
पाच दिवसांनी जेव्हा अथर्व स्वतःच्या हाताने जेवू लागला, तेव्हा त्या आई-बापाच्या डोळ्यातले अश्रू हेच आमचं खरं 'पेमेंट' होतं.
डिस्चार्जच्या दिवशी अथर्वने हसून माझ्या हातावर एक गुलाबाचं फूल ठेवलं.
ते फूल कोमेजून जाईल... पण मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या त्या चिमुकल्याचं हसू मला आयुष्यभर पुरणारं आहे.
हेच ते क्षण, जे आम्हाला सांगतात... "डॉक्टर का झालो!"
सरकारी हॉस्पिटलमध्ये गर्दी असते, गोंधळ असतो... पण तिथेच अनेकदा माणसातला 'माणूस' भेटतो. ❤️
डॉ. जयेश देसले
पिडियाट्रिक सर्जन, पुणे
#DrJayeshDesale
#Sassoon #DoctorLife #PatientStory #RealHero #PuneDoctors #MedicalMiracle #Emotional #PediatricSurgeon


