" एका महिन्याच्या आत माझ्यासाठी एक अशी इंडियन मुलगी शोधा जी माझ्यासोबत हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला तयार होइल " आदित्य त्याचा कोट अंगात चढवत म्हणाला.
" आणि हो याची भणक जर कुणाला लागली तर तुमचा खून मी माझ्या या हातानी करेन " आदित्य दोघांनाही धमकीवजा सुरात म्हणाला आणि त्यानी भीतीने आवंढा गिळत एकमेकांना पहिलं.
" चला कामाला लागा आपल्याकडे वेळ कमी आहे" असं म्हणून आदित्य केबिन बाहेर निघुन गेला....
" काय मानुस आहे याच्यासाठी आता मुलगी शोधा तेही इंडीयन" प्रशांत म्हणाला.
" आणि फक्त सहा महिन्यांसाठी" जाफर म्हणाला...
दोघेही कूठे फसलो या आविर्भावात एकमेकांना बघतं होते.
"माणसाचा वेडेपणा कुठवर जातो बघ... इंडियन मुलगी... आणि तीही फक्त सहा महिन्यांसाठी," प्रशांत डोकं धरून म्हणाला.
"आता काय करायचं?" जाफर चिंतेने म्हणाला.
"करायचं काय? आपण आपले सगळे कॉन्टॅक्ट्स, जुन्या ओळखी, डेटाबेस सगळं खणून काढायचं... कुठेतरी आपल्याला एक 'बिचारी' मुलगी सापडलीच पाहिजे, नाहीतर हा रावण आपल्याला जाळून खाईन" प्रशांत डोकं खाजवत म्हणाला. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच त्याची इंडियन बिचारी गरीब मुलगी शोध मोहीम सुरू झाली....
दुसऱ्या दिवशी प्रशांत जफर च्या घरी गेला दोघे मिळून बाहेर मुलगी शोधायला जाणार होते...
" काही ठरवलं का कुठे जायचं? कशी कुठे शोधायची मुलगी?", प्रशांत
" हे बघ " जाफरने लॅपटॉप उघडला.
"बघ... इथे हजारो मुली आहेत!" जाफर म्हणाला आणि प्रशांतने लॅपटॉप वरील साईटवर असणारे मुळात इंडियन पण फुली अमेरिकन मुलींचे प्रोफाइल पाहिले – सगळ्या मुली खूप सुंदर तर होत्या पण त्यांचे फोटो आणि त्यांच्याबद्दल माहिती वाचून प्रशांत ने लॅपटॉप स्क्रीन लगेच बंद केली...
"या नाही जमणार" प्रशांतने लगेच स्क्रीन बंद केला.
"का रे काय झालं? किती सुंदर स्टायलिश मुली आहेत त्यात इंडियन सुध्दा... बॉसला नकीच आवडतील"जाफर
" त्याला काय या सगळ्याच आवडतील पण ग्रँडमा? त्यांना नाही आवडणार?", प्रशांत
" म्हणजे?", जाफर.
"म्हणजे त्यांना नुसती इंडियन मुलगी नाही तर सुशील, संस्कारी, एकदम परफेक्ट मॅरेज मटेरियल टाईप मुलगी सुन म्हणून हवी आहे आली या मुली जन्मात तश्या ना असतील ना दिसतील " प्रशांत दीर्घ श्वास घेत म्हणाला.
" पण अशी संस्कारी मॅरेज मटेरियल टाईप मुलगी मुलगी बॉस बरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कशी करेल..?", जाफर
" तोच तर प्रोब्लेम आहे... कारण आदित्यला संस्कारी मुलगी पाहिजे नाही... त्याला 'कॉन्ट्रॅक्ट रेडी' मुलगी पाहिजे आणि ग्रँडमाला संस्कारी जी कधीच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करणार नाही "
"मग आता?", जाफर निराश होत म्हणाला.
" अशा साईटवरील मुली नाही जमणार प्रत्यक्षात आपल्याला मुली पाहाव्या लागतील "
" म्हणजे आता आपण मुली पाहायला जायचं तेही आपल्यासाठी नाही बॉस साठी... कुणाला कळलं तर वेड्यात काढतील आपल्याला "
" पर्याय नाही.. चल" दोघेही मुलगी शोधायला बाहेर पडले...
" आपण कुठे जातोय?" जाफर
" कम्युनिटी फंक्शन... तिथं आपल्याला डायरेक्ट मुलींशी बोलता येईल.... एखादी तरी नक्कीच सापडेल जी आपल्या अटी मध्ये बसेल"
बोलत बोलत त्याची गाडी एका मोठ्या हॉल समोर येऊन उभी राहिली...दोघे कार्ड दाखवून आत गेले. तिथं एकापेक्षा एक सुंदर मुली होत्या.
"इथुन आपण वेगवेगळे होऊ"प्रशांत
" का?", जाफर
" काही प्रोब्लेम झाला तर एकमेकांना वाचवायला येता येईल " प्रशांत
" तुला मार खाण्यापासून म्हणायचं आहे का?", जाफर
" हो " प्रशांत त्या मुलींकडे बघत म्हणाला आणि पुढे गेला... जाफर त्याला बघत होता... थोडा वेळ दोघेही त्या हॉल मध्ये फिरत होते... प्रशांतला एक मुलगी आवडली तो तिच्या जवळ गेला आणि हळूच विचारलं –
"Excuse me, तुम्ही लग्न केलंय का?" प्रशांत
ती हसून म्हणाली – "नाही, अजून नाही."
"छान! मग सहा महिन्यांसाठी आमच्या बॉससोबत लग्न कराल का?"
प्रशांत ने अस विचारताच ती मुलगी थक्क होऊन त्याच्याकडे बघत होती...
" प्लीज माझ्या बॉस सोबत लग्न करा यासाठी तुम्हाला भरपूर पैसे मिळतील" प्रशांत तिचा हात हातात घेऊन तिला विनंती करत म्हणाला ती मुलगी घाबरून तिच्या आईवडिलांकडे धावत गेली.
" Excuse me miss,,," प्रशांत तिला आवाज देत होता... जाफर तिथ आला.
" काय रे काय म्हणाली ती मुलगी,,,??", जाफर
" पळून गेली.. बहुतेक तिला प्रपोजल आवडलं नाही " प्रशांत... पाच एक मिनिट अशीच गेली... दोघेही पुन्हा दुसरी मुलगी बघत होते...
" हाच तो माणूस" त्या मुलीने इशारा करून ओरडून सांगितलं... प्रशांत आणि जाफर त्या मुलीकडे बघत होते. तिच्या सोबत असणारी मूल दात ओठ खाऊन अतिशय रागाने प्रशांतकडे बघत होती...
"जाफर पळ !" प्रशांत गडबडून म्हणाला दोघेही लगेच तिथून पळाले.... ती मूल त्याच्या मागे धावली.... दोघेही त्यांना चकमा देऊन कसेतरी तिथून निसटले...
***
दोन दिवस असेच गेले त्यांनी एका लग्नाला हजेरी लावली.
"बघ बघ, ही मुलगी सुंदर आहे," जाफरने वराच्या बाजूला बसलेल्या वधूकडे बोट दाखवलं.
"चूप रे बावळटा! ती तर लग्न करायला बसलीय आधीच," प्रशांतने त्याच्या डोक्यावर थाप मारली.
"पण लग्न अजून कुठे झालंय?", जाफर
" म्हणजे?", प्रशांत प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे बघत होता...
" एक मिनिट मी आलोच " अस म्हणून जाफर नवरदेवाकडे गेला त्याने वराला जाऊन कुजबुज केली –
"भाई, तुझ्यासाठी माझ्याकडे एक ऑफर आहे?."
" ऑफर??!", नवरदेव
" हो,,, ज्यात तुला करोडो रुपये मिळतील" जाफर.
" कोणती ऑफर" वराने कुतुहलाने विचारलं
" तू आता या मुलीशी लग्न मोड..."
" व्हॉट?",
" हो.. तू हे लग्न सहा महिन्यानंतर कर... यासाठी तुला आम्ही एक करोड रुपये देऊ" जाफर.
" या मुलीशी तुझं काही लफड आहे का?", नवरदेव
" छे,,, "
" मग?",
" तुझं लग्न मोडल्यावर आम्ही या मुलीच लग्न आमच्या बॉस सोबत लावू... तेही फक्त सहा महिन्यांसाठी त्यानंतर तू पुन्हा या मुलीशी लग्न कर.. म्हणजे पैसा आणि मुलगी दोन्ही तुला मिळतील"
" तू काय मला असतास समजलास? पहिल प्रेम आहे ती माझ " अस म्हणून नवरदेव जाफरला मारायला उठला...
प्रशांत ने माफी मागून कसतरी प्रकरण सांभाळलं आणि दोघेही तिथून निघाले
रात्री दोघं क्लबमध्ये गेले. ड्रिंक करत बोलत होते..
" बापरे आज मारता मारता वाचलो... हे संस्कारी, इंडियन मुलगी शोध प्रकरण परवडण्यासारख नाही... मी आपला भारतात परत जायची तयारी करतो बाबा" जाफर म्हणाला प्रशांत हसत होता...
" खरतर बॉसला अश्या मुली हव्यात.. ग्लॅमरस, बेधडक, बिनधास्त पैशांसाठी काहीही करणाऱ्या
" जाफर एका डान्स करणाऱ्या मुलीकडे बोट दाखवत म्हणाला
" बरोबर आहे तुझं पण अशा मुलींची गॅरंटी नाही... करायला गेलो एक आणि व्हायचं भलतच... त्या रावणाने दिलेली मुदत अर्धी संपली आहे लवकर काहीतरी करायला हवं " प्रशांत विचार करत होता...
"काय करायच? पुन्हा कुणाचातरी मार खायचा का? " जाफर वैतागत म्हणाला.
" तुम्हाला मुली हव्यात का?", एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन म्हणाली. दोघेही तू कोण या आविर्भावात त्याच्याकडे बघत होते...
" माझ्याकडे ब्रिटिश, अमेरिकन, जापनीज, चायनिज, इंडियन अशा एकाहून एक चढ मुली आहेत... सगळ्यांचे रेट फिक्स आहेत त्यात माझं कमिशन वेगळं..बोला कुठली मुलगी हवी ? " तो व्यक्ती बोलतत्यांना फोटो दाखवत होता आणि हे दोघेही हतबल होत एकमेकांकडे बघत होते.... बिचारे त्याला काय उत्तर द्यावं हाच विचार करत होते....
.
.
To be continued....
"The वेडिंग 💍contract", वाचा प्रतिलिपि वर :,
https://marathi.pratilipi.com/series/the-वेडिंग-contract-2bqfc8euhiog?language=MARATHI&utm_source=android&utm_medium=content_series_share
#✍मराठी साहित्य #🌹फक्त तुझ्यासाठी.. #🌹प्रेमरंग #💔Fake Love #💔अधूर प्रेम


