ShareChat
click to see wallet page
search
#✍मराठी साहित्य #✍🏽 माझ्या लेखणीतून #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #🎑जीवन प्रवास #👍लाईफ कोट्स *पु.ल. - ' व्हता ' बरोबर की 'होता '?* *श्रोता - अर्थात 'होता', 'व्हता' चूक.* *पु.ल. - 'व्हता' चूक तर 'नव्हता' कुठून आलं?* 🤔 😂😅🤣           *असो, एवढं सोपं नाही ते...* 😅 😄 ----------------------------------------------------------- काका बँकेत खाते उघडायला गेले. व्यवस्थापकांनी त्याना एक अर्ज भरायला दिला. त्यावर लिहिले होते " नमुन्याची सही". काका भडकले आणि त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी व्यवस्थापकांना विचारले की मी नमुना आहे का? व्यवस्थापकांनी माफी मागितली आणि अर्जावर लिहीले " सहीचा नमुना ". मातृभाषे मध्ये फक्त शब्दांना नव्हे तर क्रमाला सुद्धा महत्त्व असते. 😄 ----------------------------------------------------------- मराठी भाषेची कमाल आणि धमाल...."पण" हा एकच शब्द वाक्यातली जागा बदलली, तर अर्थ किती बदलतो बघा....... *पण* तो तिच्यावर प्रेम करतो.. तो *पण* तिच्यावर प्रेम करतो तो तिच्यावर  *पण* प्रेम करतो तो तिच्यावर प्रेम *पण* करतो तो तिच्यावर प्रेम करतो *पण*.... 😄 ----------------------------------------------------------- लग्नापूर्वी, ती त्याला म्हणाली *"ते बघ...ते झाड"*....!! आणि त्याच्या मनात अनेक रोमॅन्टिक आठवणी जाग्या झाल्या लग्नानंतर, ती त्याला म्हणाली, *"ते बघ....... ते झाड "* आणि, मुकाट्याने त्याने कोपर्‍यातला झाडू उचलला. *शब्द तेच पण वेळेनुसार परिणामात बदल !* *मराठी भाषेची कमाल, अजून काय* 🤣😂🤣😂😊