ShareChat
click to see wallet page
search
अभंग-किती हे भाग्य किती हे भाग्य देवा आले माझ्या वाटे मुखी विठ्ठल नाद होई नयनी तुझे रुप साठे || धृ || अंतरे मिटली सारी तुझ्या माझ्या मधली चालली पाऊले जेव्हा पंढरपुरी वाटे || १ || तुझ्या नाम स्पर्शाने माझे कान तृप्त होई तुच माझा माय-बाप तुझ्याविना कोणी नाही || २ || आसरा तुच माझा हे दिगंबरा वसतो मी जेथे तेथे चंद्रभागा वाहते || ३ || नित्य प्रसन्न मंदिराचा गाभारा वाटे तयामात्रे सांगावे तर स्वर्गाची अनुभुती होते || ४ || विटेवरी उभा दिसे मला जगताचा कारभारी डोळे भरून पाहून दे त्यास जो आहे आम्हा भक्तांचा कैवारी || ५ || प्रसाद मजला मंदिराचा वाटे अमृत सेवन करिता जिवन धन्य होऊन जाते || ६ || किती ही तुझे गोडवे गाऊ कमीच मला वाटे जग सारे परके फक्त तुच आपुला वाटे || ७ || Written & Created By Pratik Kalunge #abhang #devotional #vitthal #viral #trending