🪷राज्यातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत प्रचंड यश भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला दिल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा अत्यंत आभारी आहे. हे यश आमच्या कार्यकर्त्यांचे आहे, हा त्यांचा विजय आहे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.े राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री मा. जे.पी. नड्डाजी आणि कार्यकारी अध्यक्ष मा. नितीन नबीनजी यांच्या मार्गदर्शनात भाजपाने हे दणदणीत यश संपादन केले.
आतापर्यंत (दुपारी 3) जे कल/निकाल आले, त्यात 2017 च्या 94 च्या तुलनेत यंदा आम्ही 129 नगरपालिकांवर (45 टक्के) यश संपादन केले.
महायुती म्हणून 215 नगरपालिका (74.65 टक्के) आम्ही जिंकल्या आहेत. (एकूण नगरपालिका : 288)
नगरसेवकांच्या जागांचा विचार केला तर 2017 ला भाजपाला 1602 जागा मिळाल्या होत्या, त्या आता 3325 (47.82 टक्के) इतक्या झाल्या आहेत. म्हणजे दुपटीहून अधिक जागा भाजपाने जिंकल्या. महायुती म्हणून 4331 जागा (62.30 टक्के) आम्ही जिंकल्या आहेत. (एकूण जागा : 6952)
महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वात झालेली ही पहिली मी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.
या निवडणुकीसाठी परिश्रम घेणारे माझे सहकारी नेते, कार्यकर्ते यांचेही अभिनंदन.
आगामी महानगरपालिका निवडणुकीचा हा ट्रेलर आहे, याहून मोठे यश संपादन करण्यासाठी ताकदीने कामाला लागा, हेच आवाहन मी कार्यकर्त्यांना करतो !
#महाराष्ट्र #भाजपा #निवडणूक #विजय #देवेंद्र फडणवीस


