आज पर्यंत तुझ्यासाठी
मी येळ किती घातला वाया
गावभर तुझ्या माघ हिंडलो
भाकरीचा तुकडा नाय राहिला आता खाया.
कडक उन्हाळ्यात थंड गार
सावली देणाऱ्या झाडासारखी दिली तुला छाया
चार चोघांचा मार खात
शेवटी पडलो तुझ्या बापाच्या पाया.
माझ्या घरच्यांच्या चोरून लपुन
करत राहिलो तुझ्यावर माया
तुझ्या सोबत बघुन मला
घरी चुगली लावत होत्या
शेजाऱ्या पाजाऱ्या बाया.
पहिला तास दुसरा तास करून
अख्ख वर्ष घातलं वाया
तुझंच नाव कोरून कोरून
रंगुन टाकल्या सगळ्या वह्या.
वाटलं होतं कधी
म्हणशील मला राया
पण काल तुझ्या नवऱ्याने
आणुन दिल्या जागरण गोंधळाच्या लाह्या.
आता जरी आज पर्यंतच
आयुष्य माझं गेलं असेल वाया
पण उद्या जर कोणी भेटली तर
पहिल्या भेटीत घेईल कोर्ट म्यारेजच्या सह्या. #📝कविता / शायरी/ चारोळी @𝄟✮͢𝓟𝓻𝓲𝔂𝓪❥❤️☆🔥⃝🕊️ @Lata K. @.⎯᪵᪵፝֟፝֟⎯꯭𝄀𝄄𝄀🌸꯭꯭Dhanshree ͟🦋 patil @❥𝄟⃝♥️Pσσʝα Cɾҽαƚισɳ[फॉलो करा]🙏𝄟⃝ 🦋❥ @@Sunitha

