#😱शिंदेसेनेच्या नेत्याची निर्घृण हत्या
रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे शुक्रवारी सकाळी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली. मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना, काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी काळोखे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून राजकीय वातावरण तापलेय. शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केला असून, निवडणुकीतील पराभवाच्या रागातून ही हत्या घडवून आणल्याचा दावा त्यांनी केलाय. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून सीसीटीव्हीच्या आधारे फरार आरोपींचा शोध सुरू आहे. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याची माहितीही समोर आली आलीय.
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🔪क्राईम अपडेट्स😎 #क्राईम #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐

