ShareChat
click to see wallet page
search
#जागतिक बालिका दिन जागतिक बालिका दिन - आज जागतिक बालिका दिन आहे. मुला-मुलींमधील भेदभाव नष्ट होऊन त्यांना समाजात प्रतिष्ठेने जगता यावे. तसेच प्रत्येक क्षेत्रात मुलींना समानतेचा दर्जा मिळावा. या हेतून ३जानेवारी हा दिवस जागतिक कन्या दिन म्हणून साजर केला जातो. भारतीय परंपरेमध्ये स्त्रीला शक्‍तीचे रुप मानले आहे. मात्र चंद्राला गवसणी घालणार्‍या आपल्या देशात आजही बालिकांसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्यात आपल्याला यश आलेले नाही. बालिका दिनाच्या निमित्ताने महिला सक्षमीकरणाला आणखी बळ देण्यासाठी समाजातील बुरसटलेली मानसिकता बदलण्याची गरज निर्माण झाली आहे मुलगा-मुलगी समान असून दोघांशी सारखाच व्यवहार होईल, याची खबरदारी घ्यायला हवी. अनेक कुटुंबांमध्ये पालक आपल्या मुलींना जन्मानंतरही चांगले वातावरण प्रदान करत नाहीत. बुरसटलेल्या आणि घाणेरड्या मानसिकतेच्या समाजाला बालिका नेहमीच बळी पडलेल्या दिसून येतात. परंतु प्रगतीचा मार्ग कितीही खडतर असला तरी रात्रीनंतर सकाळ होतेच, हे विसरता येणार नाही. मात्र बालिकांसाठी सुरक्षित समाजनिर्मितीची पहाट उगवण्यासाठी आजच्या अंधारलेल्या वातावरणामध्ये प्रबोधनातून परिवर्तन घडवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे लागतील. यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ - यांसारख्या कार्यक्रमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागेल. विद्यमान शासनाने मुलींच्या पालनपोषणाचा, विवाहाचा भार हलका व्हावा यासाठी सुकन्या योजना आणली आहे. अशा योजनांचा लाभ घेतला गेला पाहिजे. हुंड्याची कुप्रथा मोडीत काढण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यायला हवा. तसेच सामूहिक विवाहांसारख्या परंपरांचा स्वीकार करावा लागेल. पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी सामाजिक संघटनांनी, शाळांनी जबाबदारीने प्रयत्न करावे लागतील. ----------------- *लक्षात ठेवा..* ------------------ मुलगा वारस आहे.....मुलगी पारस आहे.. मुलगा वंश आहे........मुलगी अंश आहे..... मुलगा आन आहे........मुलगी शान आहे... मुलगा तन आहे........... मुलगी मन आहे.... मुलगा संस्कार आहे... मुलगी संस्कृती आहे मुलगा आग आहे....... मुलगी बाग आहे.... मुलगा दवा आहे.........मुलगी दुऑ आहे.... मुलगा भाग्य आहे......मुलगी सौभाग्य आहे मुलगा शब्द आहे........मुलगी अर्थ आहे.... मुलगा गीत आहे........तर मुलगी संगीत आहे.. *लेक वाचवा.........लेक वाढवा........लेक घडवा.* ------------------------------------------------- *संकलन :- सतीश अलोणी @* -------------------------------------------------
जागतिक बालिका दिन - ShareChat