#दिनविशेष
सरसेनापती हंबीरराव मोहिते
सरसेनापती हंबीरराव मोहिते. कराड जवळील तळबीड येथे मोहिते घराण्यामध्ये 1630 सली जन्मलेले हंबीरराव एक महापराक्रमी सेनानी होते. मोहिते घराण्याची भोसले घराण्याची अनेक पिढ्यांची सोयरीक होती.
नेसरीच्या खिंडीमध्ये झालेल्या लढतीमध्ये स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव उर्फ कुडतोजी गुजर यांना राज्याभिषेकाच्या तोंडावरच वीरमरण आले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी तळबीड येथील या वीरला म्हणजेच हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन 1674 साली स्वराज्याचे सरसेनापती बनवले.
आपल्या अतुलनीय पराक्रमाने त्यांनी स्वराज्याच्या सरसेनापती पदाची धून खंबीरपणे संभाळली.
हंबीरराव मोहिते हे महाराणी सोयराबाई यांचे बंधू या नात्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे मेहुणे होते तर करवीर संस्थान संस्थापिका मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई साहेब यांचे वडील होत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्याचा छत्रपती कोण प्रश्न निर्माण झाला त्यातून बरेच राजकारण झाले पण हंबीररावानी खंबीरपणे संभाजी राजांना साथ दिली आणि सत्तेचे चक्र फिरवून टाकलं. प्रसंगी आपली बहीण महाराणी सोयराबाई यांना खडे बोल सुनावत छत्रपती संभाजी राजांचा पक्ष घेतला. छत्रपती संभाजी राजांच्या अटकेचे प्रमाण घेऊन आलेल्या मंत्र्यांनाच मुस्क्या बांधून पन्हाळगडावर छत्रपती संभाजी राजांच्या समोर हजर केले. केवळ आणि केवळ हंबीरराव यांच्या या कृतीने मराठ्यांच्या स्वराज्यातील यादवी टळली आणि सत्ता परिवर्तन छत्रपती संभाजी राजांच्या बाजूने झाले. इथेच त्यांचे स्वामिनिष्ठ दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बरोबर त्यांनी अनेक मोहिमा केल्या. स्वराज्याचा विस्तार केला. दक्षिणेत पाच लाखाची फौज प्रचंड खजिना आणि राजधानी सोबत घेऊन आलेल्या औरंगजेबाची फार मोठ्या हिमतीने लढा दिला. वाई परिसरामध्ये मुघलांसोबत लढत असताना तोफ गोळ्याच्या स्फोटामध्ये 1687 1687 साली त्यांचा मृत्यू झाला.
स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महान पराक्रमी सेना नायकाला मानाचा मुजरा🙏🙏
#👌प्रेरणादायी स्टेट्स #🎭Whatsapp status #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🙏 प्रेरणादायक बॅनर


