*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹*
*◕जीवनातील माणिकमोती◕*
*🌹१) जिवनात त्रास करून घेणे म्हणजेच सतत जबाबदारी स्वीकारणे, आणि जबाबदारी स्वीकारणे त्रास सहन करणे किंवा काहीतरी नवीन शिकणे.*
*🌹२) मैत्री कृष्ण सुदामा सारखी असावी. एकाने गरीबीतही स्वतःचा स्वाभिनान सोडला नाही तर दुसऱ्याने धनवान असूनही त्याचा कधी अभिमान केला नाही.*
*🌹३) पैसा माणसाला वर घेवून जावू शकतो पण माणूस पैसाला वर घेवून जावू शकत नाही. पैशांचा संग्रह करण्या पेक्षा सहृदयी माणसांचा संग्रह करा. पैशा पेक्षा चांगल्या माणसांचे मोल हे अनमोल आहे.*
*🌹४) माणसाची खरी ओळख ही त्याची वाणी, विचार आणि कार्यानेच होत असते. चेहऱ्याने फक्त परिचय होत असतो.*
*🌹५) विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेतो, कृतीमुळेच सवय लागते, सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते. म्हणजे विचार हीच यशाची पहिली पायरी आहे.*
*🌹६) जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात.*
*🌹७) सत्य बोलणे जेव्हा वादग्रस्त ठरु लागते, तेव्हा समजावे कि खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतला आहे.*
*🌹८) ज्याला संधी मिळते, तो नशिबवान. जो संधी निर्माण करतो, तो बुध्दिवान आणि जो संधीचे सोने करतो, तोच विजेता असतो.*
*🌹९) वयाने मोठ्या झालेल्या माणसाचे सर्वात मोठे दु:ख हेच आहे की त्याला लहानांन सारखे मोकळेपणाने मनसोक्त रडता येत नाही.*
*🌹१०) गुरुची आज्ञापालना सारखा प्रगतीवर चटदिशी पोचवणारा दुसरा मार्ग नाही. जो आज्ञा पाळतो त्याचा अहंकार नकळत मरतो. शिवाय आज्ञा पाळली म्हणजे जबाबदारी गुरुवर आस्ते त्यात त्यांचे अनुभव असतात.*
*🌹११) आपल्याला भगवंताची नड भासत नाही म्हणून प्रेम येत नाही. आपल्याला त्याची जरूरत भासते. नड उत्पन्न होण्याकरता अभ्यास, उपासना, साधना पाहिजे.!*
*🌹१२) देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो, मग तो आधाराचा शब्द असो वा अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात.! दोन्ही पण त्याचा फायदा घेणारे नसावे.*
*🌹१३) माणुस काय आहे, हे महत्वाचे नाही. पण माणसात काय आहे, हे खुप महत्वाच आहे.*
*🌹१४) नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी आणि नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी.*
*🌹१५) ज्या घराला घडवायला पूर्ण जीवन पणाला लावले आणि त्याच घरात जर तुम्हाला बसायला बोर होत असाल. तर तुम्ही घर बनवू शकलात, पण त्या घराला घरपण नाही देऊ शकलात.*
*🌹१६) रस्त्यात जर एखादे मंदिर दिसले, तर प्रार्थना केली नाही तरी चालेल; पण जर रस्त्याने चालतांना कोणाला आपला त्रास नाही झाला पाहिजे इतकीच काळजी घ्या.*
*🌹१७) अनुभवामुळेच चांगला निर्णय घेता येतो. मात्र दुर्भाग्य हे आहे की अनुभवाचा जन्म नेहमी चुकीच्या निर्णयामुळेच होतो..!!✍🏻*
*संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*_🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपल दिवस आनंदि मंगलमय हो📿🙏🏻_*
#महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #गुड मॉर्निंग


