तुमची भाषा बदला
Tap the Share button in Safari's menu bar
Tap the Add to Home Screen icon to install app
ShareChat
*शिवविचार प्रतिष्ठान* #आजचे_शिव_दिनविशेष ********************* २२ फेब्रुवारी इ.स.१६६५ छञपती शिवरायांनी कर्नाटकातील "कारवार" जिंकले. छञपती शिवरायांचा कारवारच्या खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता. येथे शेरखानने इंग्रज व तेथील सर्व व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात शिवरायांच्या समोर रूजू केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 २२ फेब्रुवारी इ.स.१६८४ केग्विनने इंग्लडच्या राजाला पत्र केग्विनने २२ फेब्रुवारी १६८४ रोजी पुन्हा इंग्लडच्या राजाला पत्र पाठवून संभाजीराजांनी आपल्या सरहद्दीवर ३०००० सैन्य मुंबईपासून तीन मैलांवर असणार्‍या पलतात ( Paltata पलते ) या बेटावर उतरवून ते बेट व्यापण्याचा प्रयत्न केल्याचे कळवले होते. केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स , राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी संभाजी महाराजांच्याकडे पाठवले त्यांनी बिरवाडी येथे राजांची भेट घेतली व गर्व्हनर केग्विनला पत्र पाठवून उभयंतामध्ये होणार्‍या तहाच्या अटींना संमती दर्शवली होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 २२ फेब्रुवारी इ.स.१७३९ सन १९३९ च्या सुरुवातीला मराठ्यांनी धारावी माहीम काबीज केल्यानंतर खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर दिनांक २२ फेब्रुवारी सन १७३९ मोर्चा कायम झाला. इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला. इतकेच नाही तर दिनांक २६ फेब्रुवारी सन १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला. धारावी किल्यात पाण्याची सोय नाही. गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले. पोर्तुगीजांनी पुन्हा गायमुखावर हल्ला केला तोही मराठ्यांनी परतवून लावला. दिनांक २७ फेब्रुवारी सन १७३९ रोजी चिमाजीअप्पांनी शत्रूच्या आरमारावर गायमुख येधून हल्ला करण्यास हुकूम दिला. त्यानुसार रामजी महादेव, तुबाजीपंत व आंग्रे यांनी मारा सुरू केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 २२ फेब्रुवारी इ.स.१८७९ वासुदेव बळवंतांनी पुणे, नगर, नासिक या टापूत पायी प्रवास करून लोकांची विपन्नावस्था पाहिली. या दुष्काळास, दारिद्र्यास परकीय सरकार जबाबदार आहे, त्याची हकालपट्टी करून आपल्या लोकांचे शासन स्थापन केले पाहिजे, असा प्रचार त्यांनी सुरू केला. एकाच वेळी सर्व ठिकाणी उठाव व्हावेत, अशी त्यांची इच्छा होती; पण तसे साथीदार त्यांना मिळाले नाहीत. शिवाय पांढरपेशा सुशिक्षित वर्गात त्यांना पाठिंबा मिळेना; तेव्हा मागासवर्गातील रामोशी, धनगर अशांकडे ते वळले आणि स्वतःच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही मोहीम हाती घेतली. पुण्याजवळील लोणीकंद येथे बंडवाल्यांचे मुख्य कार्यालय स्थापन करण्यात आले. सरकारी खजिने, सावकार, बनिये यांच्यावर धाडी घालण्याच्या योजना आखण्यात आल्या. शासनाची नाकेबंदी करण्यासाठी रेल्वे, तुरुंग, तार आणि टपाल कचेऱ्या उद्ध्वस्त करण्याचे ठरले. २२ फेब्रुवारी १८७९ रोजी संध्याकाळी रामोशांच्या मोठ्या जमावाला जेवण घालण्यात येऊन कोणास चांदीचे कडे, तर कोणास शेलापागोटे, कोणाच्या हातावर पाच-दहा रुपये ठेवण्यात आले आणि जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड उभारल्याचे जाहीर करण्यात आले. पुढील पाच आठवडे या बंडखोरांनी धामारी, दावडी, वाल्हे, हर्णे, सोनापूर, चांदखेड इ. सह्याद्रीच्या कुशीतील गावे लुटली. सावकार लुटून पैसा उभारावयाचा आणि नव्या टोळ्या उभारून सरकारला ‘त्राही भगवन’ करून सोडावयाचे, असा वासुदेव बळवंतांचा विचार होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !! 🙏🏻🙏🏻🚩मराठा🚩🙏🏻🙏🏻 -------------------------------------------------
#

🚩शिवराय

🚩शिवराय - शिवदिनविशेष { २२ फेब्रुवारी इ . स . १६६५ } छत्रपती शिवरायांची कारवार जिंक , - ShareChat
301 जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post