तुमची भाषा बदला
Tap the Share button in Safari's menu bar
Tap the Add to Home Screen icon to install app
ShareChat
ओशोंचं एक वचन आहे की, ‘‘ उद्या वेळ मिळेल हा किती मोठा भ्रम आहे ! ’’ म्हणजे भौतिकातले प्रयत्न माणूस उद्यावर ढकलत नाही, पण साधना मात्र उद्यावर सहज ढकलतो. एखादा तरुण साधनेला लागला तर लोक त्याला सांगतात की, ‘‘ हे काय वय आहे का ? साधना काय म्हातारपणी करता येईल. ’’ असं सांगणारी काही वृद्ध मंडळी अद्याप उपासनेला लागलेली नसतात . तेव्हा काळानं काही निश्चित मुदतीची हमी दिलेली नाही. त्यामुळे जोवर देहात श्वास आहे, तोवर तो सत्कारणी लावा. सद्गुरू बोधानुसार आचरणाचा पाठ गिरवा. तो पाठ गिरवणं सोपं मात्र नाही; कारण सद्गुरूंचा बोध हा माझ्या मनाच्या भ्रामक ओढींवर आघात करणाराच असतो. त्यामुळे मन सहजासहजी त्या आज्ञेनुरूप आचरणात रुळत नाही. म्हणूनच एकनाथ महाराज सांगतात की, ‘‘ एका सद्गुरूंच्या बोधानुसार बळपूर्वक अभ्यासाला लागा . जो समस्त भवदु:खांचं हरण करतो असा श्रीहरी या भवसागरातून तारणारा आहे, म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी आणि त्याच्या बोधानुरूप जीवन घडविण्यासाठी वेगानं प्रयत्न करा. कारण हे आयुष्य काही अमर्याद नाही. ते ठरावीक काळासाठी आहे. " ( संग्रहित सदगुरुबोध ) #🙏स्वामी समर्थ
#

🙏स्वामी समर्थ

🙏स्वामी समर्थ - x श्री स्वामी समर्थ - जय जय श्री स्वामी समर्थ जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय | स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय | | आज्ञे वीणा काळ ना नेई त्याला परलोकी ही ना भीती तयाला | | 2 | | - ShareChat
144 जणांनी पाहिले
1 तासांपूर्वी
#

👫नवरा बायको / सासू सून

🙂🙏🏻 छान कविता 👌🏻 परवा परवा बायकोची तब्येत नव्हती बरी, सर्दी, खोकला, तापाने फणफणली बिचारी... मी म्हणालो आराम कर मी कामाच बघुन घेईन, एक दिवस का होईना तुझ आयुष्य जगुन घेईन ! थंड पाण्याचा पट्ट्या डोक्यावर तिच्या ठेवत होतो, थोडा थोडा बाम डोक्याला तिच्या लावत होतो ! स्वयंपाकाची वाटल करावी आता तयारी , बायको अंथरूणावरून पहात होती सारी... कणीक भिजवतांना पडल बरच पाणी, पातेल्यात भाजीची करपुन गेली फोडणी ! करपलेल्या पोळ्यामध्ये बरेच होते नकाशे, बायको सार पाहून गालातल्या गालात हसे ! एका दिवसाच्या स्वयंपाकाने उडाली माझी तारांबळ, कुठून मिळत असेल बर स्त्रियांना एवढ बळ ! जेवण घेतल वाढुन बायको म्हणाली छान झालं, तिच माझ्यावरच प्रेम पाहून मन माझ भरुन आलं ! खारट तिखट भाजीसुद्धा ती आनंदात जेवली, जळालेल्या पोळ्यावर तिने, मनातून माया लावली ! किती नाव ठेवतो आपण तिने केलेल्या स्वयंपाकाला, काय वाटत असेल बर खरच तिच्या मनाला ! तीचा चवदार स्वयंपाक अजुन चवदार लागतो, आजारी पडली तेंव्हापासुन मी शहाण्यासारखा वागतो !
217.5k जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post