तुमची भाषा बदला
Tap the Share button in Safari's menu bar
Tap the Add to Home Screen icon to install app
ShareChat
#

👫नवरा बायको / सासू सून

बायको कोण असते... कधी ती पायात लुडबुडणारी मांजर असते कधी ती लाडिक चाळे करणारी प्रेयसी असते कधी ती अटीतटीने भांडणारी विरुद्ध पार्टी असते कधी समजून घेणारी मित्र असते कधी त्रास देणारी डोकेदुखी असते कधी मस्का लावणारी असते कधी जवळ असावी असे वाटताना गैरहजर असते आणि कधी नको असताना जवळ असते कधी न सांगता समजून घेते कधी गैरसमज करून घेते कधी मुलांची काळजी करते कधी स्वतःच्या रुपाची तारीफ करते कधी नवर्याला नावे ठेवते कधी नवर्याचा पगार वाढवून सांगते कधी फिरायला नेलं कि नखरे करते कधी हट्टउन हौस पुरवून घेते कधी हौसेने नवीन पदार्थ करून खायला देते कधी शॉपिंगने बेजार करते कधी नवर्यासाठी कौतुकाने काहीतरी खरेदी करते कधी कोणाची गुपितं सांगते कधी कोणाला कळू न देता गुपचूप कारभार उरकते कधी तंबी देऊनच घराबाहेर सोडते कधी घरी यायची वाट बघत बसते कधी सरळ सूत तर कधी संशयाचं भूत असते कधी नवर्याला लगाम घालू पाहते कधी नवर्यावर प्रेमाचा वर्षाव करते कधी शेळी तर कधी वाघ असते कधी आंबट तर कधी गोड असते कधी न म्हणते - आज मी दमले, कधी न संपणारी घराची उर्जा असते कितीही भांडली तरी मुकाट्याने जेवायला घालते... बायको कशीही असली तरी 'वरच्या'ने बरोबर शोधून 'घरची' म्हणून आपल्याशीच जोडी लावून दिलेली असते... #👫नवरा बायको / सासू सून
65.8k जणांनी पाहिले
22 तासांपूर्वी
#

👫नवरा बायको / सासू सून

🙂🙏🏻 छान कविता 👌🏻 परवा परवा बायकोची तब्येत नव्हती बरी, सर्दी, खोकला, तापाने फणफणली बिचारी... मी म्हणालो आराम कर मी कामाच बघुन घेईन, एक दिवस का होईना तुझ आयुष्य जगुन घेईन ! थंड पाण्याचा पट्ट्या डोक्यावर तिच्या ठेवत होतो, थोडा थोडा बाम डोक्याला तिच्या लावत होतो ! स्वयंपाकाची वाटल करावी आता तयारी , बायको अंथरूणावरून पहात होती सारी... कणीक भिजवतांना पडल बरच पाणी, पातेल्यात भाजीची करपुन गेली फोडणी ! करपलेल्या पोळ्यामध्ये बरेच होते नकाशे, बायको सार पाहून गालातल्या गालात हसे ! एका दिवसाच्या स्वयंपाकाने उडाली माझी तारांबळ, कुठून मिळत असेल बर स्त्रियांना एवढ बळ ! जेवण घेतल वाढुन बायको म्हणाली छान झालं, तिच माझ्यावरच प्रेम पाहून मन माझ भरुन आलं ! खारट तिखट भाजीसुद्धा ती आनंदात जेवली, जळालेल्या पोळ्यावर तिने, मनातून माया लावली ! किती नाव ठेवतो आपण तिने केलेल्या स्वयंपाकाला, काय वाटत असेल बर खरच तिच्या मनाला ! तीचा चवदार स्वयंपाक अजुन चवदार लागतो, आजारी पडली तेंव्हापासुन मी शहाण्यासारखा वागतो !
141.1k जणांनी पाहिले
23 तासांपूर्वी
#

⚕️आरोग्य

स्त्रीयांनी कुंकू का लावायचे? मी एक गोष्ट ऐकली ती अशी, एक फॉरेस्ट ऑफिसर नवीन लग्न झालेला जंगलातील कॉर्टर मध्ये राहत होता. त्याच्या बायकोला ब्लीडींगचा त्रास झाला, रक्त थांबत नव्हते, डॉक्टरांनी सांगितले आठ दिवसांची सोबतीण आहे. काय तिच्या इच्छा असतील त्या पूर्ण करा. तो हताश झाला होता. एक पागोटेवाला म्हातारा आला, त्याला म्हणाला तुझी बायको आजारी आहे ना? मी सांगतो ते कर. ऑफिसर ने विचार केला ऐवीतेवी बायको मरणार, चला करून पाहू. म्हाताऱ्याने केळी आणण्यास सांगितले. त्यांनी केळी आणली. एक केळं सोलून फाकवुन त्यात पिंजर (हळदीचे कुंकू ) घातले. आणि ते केळं त्याच्या बायकोला खाण्यास दिले. असे २-३ वेळा दिले. ब्लीडींग थांबले आणि दोन दिवसात त्याची बायको घरात काम करू लागली. गोष्ट ऐकल्यावर माझ्या मनात विचार सुरू झाले, पूर्वी लहानपणापासून मुलींना कुंकू लावायची आपल्याकडे पद्धत होती. कपाळावर कुंकू लावतात तेथे अक्युप्रेशरचा पिच्युटरी ग्लॅन्ड चा पॉईंट आहे तसेच तिथे आज्ञा चक्रही येते. तिथे हळदीचे कुंकू लावले की कुंकवातील द्रव्य तिथे अॅबसॉर्ब होऊन पिच्युटरी ग्लॅन्ड ऍक्टिव्ह होते. त्यामुळे हार्मोन सिक्रीशन नीट होते. त्यामुळे पूर्वी बायकांना पाळीचे त्रास कमी होते. मी हळदीचे कुंकवाचे टिंक्चर करून ते होमीओपॅथी पद्धतीने सूक्ष्म करून साखर केली व पाळीचा त्रास असलेल्या स्त्रियांना दिले. त्यांची ३-४ महिन्यात पाळी नॉर्मल होऊ लागली. कुंकवाच्या गोळ्या करून दिल्या, ४ दिवसानंतर होणारे ब्लीडींग थांबले. आमच्या पूर्वजांनी बायकांनी कुंकू लावायचे ही प्रथा पडून बायकांचे आरोग्य सांभाळले, धंदा केला नाही. कुंकू हे हळदीपासून तयार केलेले असावे. टिकली लावून उपयोग होत नाही. ज्या शिकलेल्या, फॉर्वर्ड बायकांना कुंकू लावण्याची लाज वाटते किंवा कमीपणाचे वाटते. त्यांनी रात्री झोपताना कुंकू पाण्यात कालवून औषध म्हणून लावावे. कुंकू शुध्द असणे हे फार महत्वाचे आहे. शुद्ध कुंकू कसे ओळखावे - १] कुंकवाला हळदीचा वास येतो. २] थोडे कुंकू हातावर घेऊन त्यावर ओला चुना चोळला तर काळे होते. त्यात रंगाची भेसळ असेल तर रंग लाल राहतो. ✒ डाँ.अरविंद जोशी. 👉🏻बांगडी, पैंजण आणि जोडवी केवळ सौभाग्याचे वान नसुन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 👉🏻 सोन्याचे दागिने उष्णता आणी चांदीचे दागिने थंड परिणाम देतात. कंबरेच्या वरिल भागात सोन्याचे दागिने आणी कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजेत. हा नियम पाळल्याने शरीरातील उष्णता आणि शितलतेचे संतुलन राहते. ● बांगडी घालण्याचे फायदे ● १) बांगडी मनगटावर घासली जाते त्यामुळे हाताच रक्तसंचार वाढतो. २) हे घर्षण उर्जा निर्माण करते यामुळे अशक्तपणा जाणवत नाही. ३) बांगडी घातल्याने श्वासासंबंधी व ह्रद्यासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते. ४)बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत होते. ५)तुटलेली बांगडी घालुन नये, याने नकारात्मक उर्जा वाढते. ● जोडवी घालण्याचे फायदे ● १) विवाहित स्त्रिया पायातल्या तीन बोटांमध्ये जोडवी घालतात. हा दागिना केवळ श्रृंगाराची वस्तु नाही. २) दोन्ही पायांत जोडवी घातल्याने शरीरातील " *Hormonal System* " योग्यरित्या कार्य करत. ३)जोडवी घालण्याने " *Thyroid* " चा धोका कमी होतो. ४)जोडवी " *Acupressure* " उपचार पद्धतीवर कार्य करतात ज्यामुळे शरीरातील खालील अंगाचे मज्जासंस्था आणी स्नायु मजबूत होतात. ५) जोडव्यांमुळे एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीतपणे चालू राहतो. या प्रकारे, जोडवी स्त्रियांची गर्भधारणा क्षमता निरोगी ठेवते व मासिक पाळी ही नियमित होते. ● पैजण घालण्याचे फायदे ● १)पैजण पायातुन निघणारी शारीरिक विद्युत उर्जा शरिरात संरक्षित ठेवते. २) पैजण स्त्रीयांचे पोट आणी त्यांच्या शरीरातील खालील भागातील " *Fat's* " कमी करण्यात मदत होते. ३)वास्तुशास्त्रानुसार पैजणातून येणा-या स्वराने नकारात्मक उर्जा दूर होते. ४) चांदीच्या पैजणामुळे पायाचे घर्षण होऊन पायाचे हाड मजबूत होते. ५) पायातील पैजणामुळे महिलांची इच्छा-शक्ती मजबूत होते. याच कारणामुळे स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता कुटुंबाच्या सगळ्या गरजा पुर्ण करण्यात दिवस घालवून देते.६) पायात सोन्याचे पैजण घालू नये. याने शारीरिक उष्णतेचे संतुलन बिघडून आजार होण्याची शक्यता असते. ✒डॉ. सौ.निलिमा सावंत. (आयुर्वेदाचार्या) *सीतारामराजयोग* #⚕️आरोग्य
141.8k जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post