Gadchiroli Crime: वरिष्ठांच्या अश्लील मागण्यांना कंटाळून कंत्राटी परिचारिकेचा टोकाचा निर्णय
गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यातील एका कंत्राटी परिचारिकेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या सततच्या अश्लील मागण्या आणि मानसिक छळाला कंटाळून विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परिचारिका सध्या जिल्हा रुग्णालयात उपचाराधीन असून तिच्या जबाबावरून पोलिसांनी संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यावर झिरो एफआयआर दाखल केला आहे., महाराष्ट्र News, Times Now Marathi