#😱भीषण अपघात: मृतदेह पत्रा कापून बाहेर काढले
मध्यरात्री एकच्या सुमारास तब्बल 100 च्या स्पीडने चाललेली आलिशान कार ट्रकमध्ये मागील बाजून घुसल्याने कारमधील 5 व्यावसायिकांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, गॅस कटरने कार कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. या अपघातात कार तब्बल 25 मीटर ट्रकमागून फरफटत गेली. हा अपघात पाटणामधील परसा बाजार पोलिस ठाण्याच्या महोली उड्डाणपुलाखाली झाला. हा अपघात इतका भीषण होता की कार ट्रकमध्ये घुसली. ट्रक चालकाला त्याची माहितीही नव्हती. त्याने कार 25 मीटरपर्यंत फरफटत नेली.