आईवडील फक्त आपल्याला जन्म देतात ते तर आपले पहिले गुरू पण आपल्याला जगात कस जगायचं त्याच व्यवहार ज्ञान तर आपले खरे गुरु म्हणजे च शिक्षक देतात त्यांची शिकवण आपल्याला पावलो पावली मदत्त करते
आपण कुठेही चुकलो तर आईवडील आपल्याला पाठिशी घालतात पण शिक्षक आपली तीच चूक आपल्याला दाखवून देऊन देतात त्यांचा एकच उद्देश असतो की पुढे आपल्याला ठेच लागू नये
लहानपणी भर पावसात गुरुपौर्णिमा असली की गुलाबाची फुले शोधायला जायचे सगळ्या च्या आधी सर्व शिक्षकांना गुलाब द्यायचे त्यांना नमस्कार करायचे आजही ते दिवस आठवले तरी खूप आंनद होतो
आज मी जे काही आहे त्यात माझ्या आईवडीलांचा तर हात आहे पण त्याहीपेक्षा माझ्या सर्व शिक्षकांचा जास्त आहे म्हणून च म्हणतात की
मातृदेवो नमः
पितृदेवो नमः
आचार्य देवो नमः
"आई वडील सर्व प्रथम गुरु"
"त्या नंतर माझे अस्तित्व सुरू"
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸
*"गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः*
*गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।"*
*माझ्या जीवनात मर्गदर्शन करणाऱ्या
ज्ञात-अज्ञात, लहान-मोठया अशा सर्व
शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏 #शिक्षक #शिक्षक दिन #शिक्षक दिन #शिक्षक दिनाच्या शुभेच्छा #शिक्षक दिन#


