#लक्ष्मीपूजन च्या हार्दिक शुभेच्छा #👣गजानन महाराज🌺
*संतांची दिवाळी*
*संत ज्ञानेश्वर*
१) सुर्ये आधिष्ठीली प्राची |
जगा जाणिव दे प्रकाशाची ||
तैसी श्रोतया ज्ञानाची |
दिवाळी करी ||
२) मी अविवेकाची काजळी।
फेडूनि विवेकदीप उजळी।
तैं योगिया पाहें दिवाळी।
निरंतर।।
मनातील अविवेक, अज्ञान आणि अहंकाराचा अंधार विवेकाच्या दिव्याने एकदा का दूर केला की मनुष्याच्या जीवनात निरंतर म्हणजे सतत दिवाळीच नांदते.
*संत नामदेव*
सण दिवाळीचा आला।
नामा राऊळाशी गेला॥
हाती धरोनी देवाशी।
चला आमुच्या घराशी॥
*संत जनाबाई*
आनंदाची दिवाळी।
घरी बोलवा वनमाळी॥
घालीते मी रांगोळी।
गोविंद गोविंद॥
*संत तुकाराम*
१) साधू संत येती घरा। तोची दिवाळी दसरा॥
२)दसरा-दिवाळी तोची आम्हा सण। सखे संतजन भेटतील॥
३)तुका म्हणे त्यांच्या घरची उष्टावळी। मज ते दिवाळी दसरा सण॥
*अज्ञानाच्या अंधकाराकडुन ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणा-या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.*

