सत्य परिस्थिती आहे,
शिक्षण हे सध्या भविष्यात लुटायचे साधन नक्की होणार,
रांगेत पालक डोनेशन घेऊन उभे राहणार,
ब्रँडेड शाळा लुटायला सिद्ध होणार,
विद्यार्थी मात्र हतलब,
पालकांच्या इच्छा पूर्ती साठी,
खांद्यावरून डिजिटल ओझे घेऊन जाणार,
शिक्षण क्षेत्राच्या आवारात खेळ मात्र विद्यार्थी विसरून जाणार,
शाळेत शिक्षकांचे लेक्चर,
घरी मात्र गृहपाठ,
क्लास मधे जाऊन तोलून मापून टक्केवारी त्यात वाढवीत राहणार,
अभ्यासाचा भविष्यातील खेळ खंडोबा,
ऑनलाईन शिक्षण घेत, भविष्यातून घरातून होत राहणार....
शाळा बंद, मग होम वर्क कम...
पुढे होत शाळेच्या जागेत मोठे मोठे गृह संकुल उभे राहणार...
पुजारी धनवान आणी शिक्षक भविष्यात मात्र बेकार असे विदारक चित्र निर्माण होणार..
**स्नेहल मोहित**
(पत्रकार, लेखक, कवी, शायर, सामाजिक कार्यकर्ता) #💞Heart touching शायरी✍️ #🙏कर्म क्या है❓ #💝 शायराना इश्क़ #✡️सितारों की चाल🌠