#😭सुप्रसिद्ध अभिनेते सतिश शाह यांचे निधन💐
आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि विनोदी शैलीमुळे रसिकांच्या मनावर रुंजी घालवणारे ज्येष्ठ अभिनेते सतिश शहा यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे.
‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली तर ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेतून त्यांना घराघरात लोकप्रियता मिळाली. अनेक चित्रपटात त्यांनी बहुरंगी भूमिका साकारल्या. आपल्या सहज विनोदी अभिनयामुळे त्यांनी हिंदी मालिका - चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान मिळवले. त्यांच्या निधनाने आपण हरहुन्नरी कलाकार गमावला आहे, याचे अतीव दुःख आहे. सतिश शहा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐
#भावपूर्ण श्रद्धांजली #📢25 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #दुःखद

