Cashless India
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकतेच भारतातील पहिले “ऑफलाइन डिजिटल रुपया” (Offline Digital Rupee – e₹) अधिकृतपणे लॉन्च केले असून, हे पाऊल देशातील डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ऐतिहासिक मानले जात आहे जे भारताला Cashless India बनविण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५ दरम्यान मुंबईत, आरबीआयने हे नवे चलन जाहीर केले. यामुळे आता इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्क नसतानादेखील डिजिटल रुपयाच्या माध्यमातून थेट व्यवहार शक्य झाले आहेत, आणि हे अगदी तुमच्या खिशातील रोख रकमे प्रमाणे सहज वापरता येते.