कोथरूड येथील तीन मुलींच्या पोलिसांनी केलेल्या छळ प्रकरणात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर काल औरंगाबाद, पुणे (कोथरूड) पोलिसांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी यात कायदेशीर महत्त्वाची भूमिका बजावली. ॲड. अरविंद तायडे हे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करतात.
पुणे पोलीस आयुक्तालयात पोलिसांनी त्या मुलींची तक्रार घ्यावी ह्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर हे पहाटे ३ वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात बसून होते. स्वतः नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी पुणे पोलीस अधिकाऱ्यांना 'कायदा हा कायदा असतो', अशी समज दिली होती.
लोकमत,महाराष्ट्र टाइम्स पुणे, महाराष्ट्र टाइम्स
या सारख्या माध्यमांनी काल पोलिसांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर बातम्यामधून पूर्णपणे वंचित बहुजन आघाडीचे नाव वगळले आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे. माध्यमांनी निःपक्षपातीपणे वागले पाहिजे.
#☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #वंचित बहुजन आघाडी #बाळासाहेब आंबेडकर कट्टर समर्थक


