ShareChat
click to see wallet page
search
#✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 केंद्र सरकारने घरभाडे नियम 2025 लागू करत भाडेकरू–मालक संबंधांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता घरभाडे वर्षातून फक्त एकदाच वाढवता येणार असून, त्यासाठी 90 दिवस आधी नोटीस देणे बंधनकारक आहे. अचानक भाडेवाढ, तोंडी वाद आणि गैरसमज टाळण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. भाडे 5,000 रुपये असेल तर पेमेंट डिजिटल करणे बंधनकारक, ज्यामुळे रोख व्यवहारातील तणाव कमी होणार. तर 50,000 रुपयांपेक्षा जास्त भाडे असल्यास सेक्शन 194IB नुसार TDS भरावा लागणार. सर्वात मोठा दिलासा म्हणजे आता 10 महिन्यांच्या डिपॉझिटचा काळ संपला! नव्या नियमानुसार सुरक्षा अनामत रक्कम फक्त 2 महिन्यांच्या भाड्याइतकी असणार. यामुळे स्थलांतर करणाऱ्यांचा प्रारंभीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, विशेषतः मेट्रो शहरांतील भाडेकरूंना मोठा फायदा होईल. #कायदा #📄सरकारी योजना #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ब्रेकिंग न्यूज
✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 - ShareChat
00:46