कविता.....
जीव गुंतला......
चंद्र म्हणतो चांदणीला
तुझ्यात जीव गुंतला !
खरे सांगितले म्हणून
ठेवू नको जीव टांगणीला..
हळूवार भावनांचे
कारंजी उडतात जीवनात !
ध्यानीमनी अन् स्वप्नी
भावना उमलतात ह्रदयात..
चेहऱ्यावर मधुर हसू
जसे चांदणे फुलावे !
भाव सांगुन जातो
एकमेकात रमून जावे..
गुंफतो सुखाचा धागा
ह्रदयाच्या कोंदणात !
नाजूक बंधाचे धागे
असे जपावे जीवनात...
© अनिल दाभाडे
रसायनी
मोबा..7028138060
दि.08आँक्टोबर2025.- सायं.19.37 #kavita charoli