तु दारात
तर मी घरात,
वाजत असते
दिवस भर
आमची वरात.
तु वादळ
मी शांत वारा
चढणार तुझा पारा,
झेलणार मी
फक्त गारा.
तु भाकर
मी साखर,
तु ह्याकर
मी नोकर.
मी जवळ
तु दुर दुर,
जाणार कुठे
लागणार मला
चुर चुर.
तु हँडल
मी चाक,
तु हाक
मी फक्त
पेट्रोल टाक.
तुझं हसणं
माझं फसणं,
तुझं रुसणं
मी नुसतं
डोळ पुसणं.
तु पळपट
मी लाटणं
तुझा स्वयंपाकाचा थाट
मी फक्त चपात्या लाट
तुझं सजणं
माझं बघणं,
तु ओठावरची लाली
हसु माझ्या गाली.
तु घरी
मी दारी
माझं काम
पण तुझे दाम.
पण शेवटी
तु आणि मी
यात नातं तरी काय
तु मोबाईल
आणि मी wifi.
#🥰प्रेम कविता📝 #🌹मराठी शायरी #📝कविता / शायरी/ चारोळी #🖋शेरो-शायरी #💞इश्क-मोहब्बत शायरी🤩