|| श्रीराम ||
*🌹 खग्रास चंद्रग्रहण 🌹*
*भाद्रपद शुद्ध पौर्णिमा शके १९४७ रविवार दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी*.
*ग्रहण स्पर्श रात्री ९.५७* , *संमीलन रात्री ११ वाजता* #सूर्य ग्रहण 🌞/चंद्र ग्रहण.🌛 #🌚चंद्र ग्रहण 🌘🌑 #चंद्रग्रहण 🌚
*ग्रहण मध्य -- रात्री ११.४२, उन्मीलन रात्री १२.२३*
*ग्रहण मोक्ष रात्री १.२७(७तारखेची रात्र)*
(वरील सर्व वेळा भारतासाठी आहेत.)
*ग्रहण दिसणारे प्रदेश* --- भारतासह संपूर्ण आशिया खंड , अफ्रिका खंड, संपूर्ण युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नॉर्वे, अंटार्क्टिका या प्रदेशात ग्रहण दिसेल.
हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे.
*पुण्यकाल* - ग्रहणस्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काळ पुण्यकाल आहे. *वेधारंभ* - हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरु होत असल्याने ३ प्रहर आधी म्हणजे दुपारी १२:३७ पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील. वेधकाळात भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत, मात्र वेधकाळात इतर आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप घेणे ही कर्मे करता येतात. *बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती व गर्भवतींनी सायंकाळी ५:१५ पासून ग्रहणाचे वेध पाळावेत*. ग्रहण पर्वकाळ म्हणजे *रात्री ९:५७ ते रात्री १:२७ या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करु नयेत*.
*ग्रहणातील कृत्ये* - *ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणकालामध्ये (पर्वकालामध्ये) झोप, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, भोजन व कामविषयसेवन ही कर्मे करू नयेत. अशौच(सोहेर , सुतक)असता ग्रहणकालात ग्रहणसंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते*.
*ग्रहणाचे राशिपरत्वे फल* --- मेष, वृषभ, कन्या, धनु या राशींना शुभफल. मिथुन, सिंह, तुला, मकर या राशींना मिश्रफल, *कर्क,वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना अनिष्ट फल आहे. *ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये*.
वरील सर्व माहिती दाते पंचांग पान नंबर 24 वर दिलेली आहे.
भरपूर प्रमाणात नामस्मरण करा आणि आनंदात राहा.
*|| श्रीराम जयराम जयजय राम ||*
01:25

