ShareChat
click to see wallet page
search
https://batminews.com/nobel-prize-maria-corina-machado/ #latest news
latest news - ShareChat
Nobel Prize, Maria Corina Machado
नॉर्वेजियन नोबेल समितीने २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार (Nobel Prize) व्हेनेझुएलातील जनतेच्या लोकशाही हक्कांसाठी अविरत संघर्ष करणाऱ्या आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य व शांततामय संक्रमण साध्य करण्यासाठी झुंजलेल्या मारिया कोरीना माचादो (Maria Corina Machado) यांना प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मारिया कोरीना माचादो या व्हेनेझुएलातील प्रसिद्ध विरोधी पक्ष नेत्या असून त्या देशातील लोकांना स्वातंत्र्य, मुक्त निवडणुका आणि मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून सक्रिय आहेत. दडपशाही, धमक्या आणि वैयक्तिक सुरक्षेला असलेल्या धोक्यांनाही न जुमानता त्यांनी जनतेचा आवाज बुलंद ठेवला. नोबेल समितीच्या मते, माचादो यांचे नेतृत्व हे लॅटिन अमेरिकेतील नागरी धैर्याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी देशातील विविध राजकीय गटांना एकत्र आणून शांततेच