जगतविख्यात पार्श्वगायिका, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे संगीत क्षेत्रातला चिरतरुण आणि अजरामर आवाज. त्यांचा आवाज म्हणजे भारतीय संगीत विश्वातील ध्रुवतारा! त्यांच्या दैवी स्वरांनी आठ दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध केले आहे. नानाविध भाषांमध्ये लतादीदींनी गायलेल्या असंख्य गाण्यांच्या माध्यमातून त्या कायमच आपल्यात जिवंत राहतील. गानकोकिळेस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#LataMangeshkar
#latamangeshkarji
#लता मंगेशकर #लता मंगेशकर जयंती #लता मंगेशकर जयंती💐 #🌷लता मंगेशकर जयंती 🎤 #🙏🌷गानसम्राज्ञी लता मंगेशकर जयंती💐