#😱शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणीत वाढ🔴
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योगपती नवरा राज कुंद्रा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. प्रसिद्ध उद्योगपती दिपक कोठारी यांनी मुंबई पोलिसांकडे ही तक्रार दाखल केली होती. तक्रारीमध्ये शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीवर 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी शिल्पाच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा विरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.