ShareChat
click to see wallet page
search
#मराठी कविता संग्रह
मराठी कविता संग्रह - कशी सांग जाऊ कुठे सांग जाऊ? असे ऐल माझा नि तू पैलही तुझ्या देहमार्गी उभा जन्म माझा तुझ्यापास असणार रे अंतही जणू प्रार्थनेतील व्याकूळता मी प्रसादातली तृप्तता पूर्ण तू व्यापुनी जी कणाला, मनाला उरे अशी शांतता मंदिरातील तू तुझ्या मुग्ध शब्दातली गेयता मी तुझ्या सौम्य ओळीतले मी ऋतू तुझ्या अक्षरांच्या सरी झेलताना किती जायचे रे नव्याने उतू कुठे भान आहे दिशांचे जगाचे मला भानही ना स्वतःचे इथे निघाले तुझे हात घेऊन हाती তিথ নু নিঘালাম না না নিথ जशी मावळे सांज क्षितिजावरी मी तुझे शुभ्र अवकाश कवटाळते माझ्यातुनी मी फुटू लागते रात्र तुझ्या चंद्रकक्षेत सामावते नको आणि काही मिठीच्या पुढे मग मिटू लागतो किर्र अंधारही उशाला तुझा स्पर्श येतो हवासा उद्याला तसा अर्थ आकारही कशी सांग जाऊ कुठे सांग जाऊ? असे ऐल माझा नि तू पैलही तुझ्या देहमार्गी उभा जन्म माझा तुझ्यापास असणार रे अंतही जणू प्रार्थनेतील व्याकूळता मी प्रसादातली तृप्तता पूर्ण तू व्यापुनी जी कणाला, मनाला उरे अशी शांतता मंदिरातील तू तुझ्या मुग्ध शब्दातली गेयता मी तुझ्या सौम्य ओळीतले मी ऋतू तुझ्या अक्षरांच्या सरी झेलताना किती जायचे रे नव्याने उतू कुठे भान आहे दिशांचे जगाचे मला भानही ना स्वतःचे इथे निघाले तुझे हात घेऊन हाती তিথ নু নিঘালাম না না নিথ जशी मावळे सांज क्षितिजावरी मी तुझे शुभ्र अवकाश कवटाळते माझ्यातुनी मी फुटू लागते रात्र तुझ्या चंद्रकक्षेत सामावते नको आणि काही मिठीच्या पुढे मग मिटू लागतो किर्र अंधारही उशाला तुझा स्पर्श येतो हवासा उद्याला तसा अर्थ आकारही - ShareChat