#व्यसन मुक्त भारत अभियान #व्यसन मुक्तीसाठी उपाय #व्यसन
व्यसनं सगळीच जिवघेणी
तुला काहीच का न कळे
इतके अनमोल शरीर तुझे
त्यांच्यासवे जळे...
म्हणे तंबाखू आणि चुण्याचा
चांगलाच जमतो मेळ
पण आयुष्याचा माञ
तुमच्याच होतो खेळ...
फॅशन म्हणून तुम्ही
उगीच खाता बार
निरर्थक पैसा खर्चून
कुटुंबावर टाकता भार...
खाणाऱ्यांना वाटे आपली
इतरांवेगळी स्टाईल
मग का म्हणून चेहऱ्यावरची
तुमच्या गायब झाली स्माईल...
देशी असो की विदेशी
घाणच असते दारू
हळूहळू तिच तुमचे
आयुष्य लागते सारू..
पंग झाले की तुम्ही
करू लागता चॅलेंज
लोकाचं काय जातं हो
तुमचाच बिघडतो बॅलेन्स...
विडी, सिगारेट, गांज्या
तुम्ही हौसैने घेता
कॅन्सर सारख्या रोगाला
उगीच निमंत्रण देता...
आता तरी एकदा
विचार करा पक्का
"निर्व्यसनी माणूस" असा
मिळविण्यासाठी शिक्का...
✍️दत्ता आसाराम पायमोडे✍️