ShareChat
click to see wallet page
search
उगीच यशाची चादर ओढून मी बसलो नाही यशाच्या मागे लपलेली कथा कोणी विचारलीच नाही. पण ही कथा आहे रक्ताच्या घामाने आटवलेल्या मातीची… संघर्षाच्या प्रत्येक थेंबाने लिहिलेल्या दिवसांची. माझं आयुष्य म्हणजे शोभेची सजावट नव्हती, तर झोपडीतल्या कंदिलाच्या उजेडात लिहिलेला आत्मविश्वास होता. गरिबी ही आमच्यासाठी कधीही भांडवल नव्हती, तिच्या नावावर कधीही सहानुभूती मागितली नाही. कारण आम्ही तुटलेल्या चप्पलांना सुद्धा शिवून वापरायचं बळ आत्मसात केलं होतं. शाळेत जाण्यापेक्षा वाटेवर चालत असताना शिकलेले धडे जास्त उपयुक्त ठरले. लोक हसले, टोमणे मारले, पण आम्ही वाकलो नाही. पोटात भुकेची आग असतानाही डोळ्यांत स्वप्नं पेटलेली होती. त्या स्वप्नांना फुंकर घालणारा कोणीतरी नव्हतं – मीच होतो, माझाच विश्वास होता. #MOTIV@TION@L VIDEO ##motiv #motiv #motiv@tiv@tion@lk@tt@ ज्यांना यश सहज मिळतं, त्यांना कदाचित त्याची किंमत कधीच कळत नाही. पण आम्ही, जे त्यासाठी झुरतो, झगडतो, दिवस रात्र झिजतो – त्यांना हे यश केवळ अधिकारी पोस्ट नव्हे, तर आयुष्याच्या प्रत्येक जखमेवरचं उत्तर असतं. मी आज इथं पोहचलोय, पण मागे वळून पाहिलं की अजूनही आठवतं – ती चिखलात ओले झालेली वही, पावसात गळक घर, आईच्या ओल्या पदरातला धीर, आणि बाबांच्या थकलेल्या हातांनी लिहिलेली आशा. म्हणून सांगतो – यश ही चादर मी उगीच ओढलेली नाही. ती मी कष्टांच्या शिवणीनं स्वतःच्या हाताने शिवलेली आहे. रक्त, घाम, अश्रू आणि अपमानाच्या शाईनं रंगवलेली आहे. आता लोक फक्त यश पाहतात, पण मला अजूनही आठवतं – त्या तुटलेल्या चप्पलांवरून सुरु झालेला प्रवास, ज्यात प्रत्येक पाऊल एक नवा लढा होता. ✍️