तुमची भाषा बदला
Tap the Share button in Safari's menu bar
Tap the Add to Home Screen icon to install app
ShareChat
#

👩‍👧‍👦 आई आणि बाळ

आई...एवढी भाजी बनवलीय. शी.... पण मिठ टाकायच कळत नाही... अस म्हणून तो भरलेल्या ताटावरून उठला. आईच्या डोळ्यांत पाणी आले. माझ बाळ उपाशी. रात्रीच्या ११ वाजता आई पुन्हा स्वयंपाकाला लागली. १२ वाजेपर्यंत मुलांच्या आवडीची भाजी केली . त्याला झोपेतून उठवले. जेवायला घातले. मगच त्या आईला झोप आली... काही दिवसांनी मुलगा काँलेजसाठी शहरात आला. रूम केली. मेस लावली. आता तीन पातळ कागदासारख्या चपात्या (पोळी) पाण्यासारखी बेचव भाजी. रेशनिंग तांदळाचा भात. खाली मान घालून खातो. मेसला उशीर झाला तर उपाशी झोपतो. आता त्याला कळतंय आई ही आई असते... ------- बापाने शिकवले. पैसा दिला. नोकरी लावली. तरी म्हणतो आमच्या म्हाताऱ्याला अक्कल नाही. लग्नासाठी मुलगी बघायला गेला. तिच्या बापाने पहिला प्रश्न विचारला. तुला पगार किती? तुझा बँक बँलन्स किती ? जन्म दात्याने कधी विचारलं नाही आणि त्यानेही कधी सांगितले नाही. पण मुलगी दात्याने विचारलं. आणि ह्याने सांगितलं आता याला कळाले बाप हा बाप असतो... ---- पण अजूनही आम्हाला आमच्या आईबापाची किंमत कळत नाही. त्यांच्याच नावाने आम्ही शिव्या देतो. त्यांनाच आम्ही नावे ठेवतो. चार फालतू पोरांत बापाची टर उडवतो. आणि बाकीचे त्या बापावर खि खि करून हसतात. खरं तर अशी मुल त्या आईबापाची असू शकत नाही... पण आज आईचा सल्ला घ्यायला आम्हाला लाज वाटते. का ? लोक दुधखुळा म्हणतील. त्या लोकांना सांगा. जो दुधाचे उपकार जाणतो आणि त्याची परतफेड करण्यासाठी दुधखुळा होतो. तोच नादखुळा कतृत्व करून दाखवतो. फक्त आई वडीलांचा आदर करावा. सारे जग जरी विरोधात गेले तरी कोणाची हिम्मत नाही तुम्हाला यशस्वी होण्यापासून अडविण्याची.... फक्त आई बापाची किंमत कळली पाहिजे. जो आईबापाची किंमत करतो जग त्याला किंमत देते. विचार आवडले तर सर्वांना, मित्रांना पाठवा. धन्यवाद
33k जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
#

👫नवरा बायको / सासू सून

छान 💏 नक्की वाचा ------------------- नवरा- बायकोच्या जोरदार भांडणानंतर खूप चिडलेला नवरा रागाने घराबाहेर जायला निघतो. .💏💏💏💏💏💏 बायको ओरडते - "कुठे चाललात मैदान सोडून ?" नवरा - जीव द्यायला. बायको - जीव द्यायचा प्लॅन कॅन्सल झाला तर , येतांना कांदे आणि तुरीची डाळ घेऊन या. "डाळकांदा कर" असं दोन दिवस झाले ओरडताय . वरील भांडणातील विनोदाचा भाग सोडला तर भारतीय नवराबायकोच्या अतूट नात्याचं आणि खंबीर विवाह संस्थेचे दर्शन होते. कारण बायकोला शंभर टक्के खात्रीअसते की, आपला प्रेमळ नवरा आपणाला आणि आपल्या लेकरांना सोडून कुठेही जाणार नाही. पण त्याचवेळी, आपल्या पतीने खरेच जीव दिला तर ? अशी शंकाही तिला घाबरून सोडते आणि त्यासाठी त्याच्या चिडलेल्या मनावर फुंकर घालण्यासाठी - "तुमच्या आवडीचा डाळकांदा करणार आहे लवकर परत या" असे लटक्या रागात सुचवते. ही ताकत आहे आपल्या भारतीय संस्काराची, संस्कृतीची आणि मजबूत विवाह संस्थेची . कितीही रागवला तरी मायेन तोच जवळ घेतो… कधी रागाने बाहेर गेला तरी त्याचे पाय आपोआप घराकडे वळतात .. मनातले भाव त्याला डोळ्यातूनच कळतात .. किती दुःखी असला तरी सारं गिळून घेतो. कोण आहे तिला आपल्या शिवाय म्हणून एक गजरा घेऊन येतो … नवरा तो नवराच असतो…. . काळजी का करतेस ? मी आहे न तुला. म्हणून किती धीर देतो. सा-या अडचणी आपल्या मनात ठेऊन बायकोकडे हास-या नजरेन पाहतो… . जसं घरावर छत असतं, तसंच आपल्या डोक्यावर नव-याचं झाकण असतं. किती सुरक्षित असतो आपण त्यांच्या सावलीत … ऊन्हाचे चटके तो खातो, पण सावली आपल्या डोक्यावर देतो.. नवरा तो नवराच असतो…. . आपण चार अलंकार घालून म्हणतो "मान माझी मंगळसुत्र तुझं, कपाळ माझं बिंदी तुझ्या नावाची .." तो कधी म्हणतो का ? "कष्ट माझे पगार तुझा… शरीर माझं आयुष्य तुझं ….. जन्म आईच्या उदरात, पडलो तुझ्या पदरात .. तू जीवन संगिनी म्हणून गोड मानत असतो …. नवरा शेवटी नवराच असतो… . संसाराचा रथ दोन चाकांवर चालतो. त्यासाठी दोघांनाही समतोल सांभाळावा लागतो…. एक चाक डगमगलं तर एका चाकावर रथ हाकणं फार अवघड होतं. . बायकोशिवाय घराला घरपण नाही, तसंच नव-याशिवाय बायको पूर्ण नाही. तो कळस आहे घराचा, छत आहे परिवाराचा… चटके तो खातो आपण मात्र सावलीत राहतो नवरा तो नवराच असतो .. . आयुष्यातल्या सगळ्या पोकळ्या भरता येतील पण नव-याची पोकळी कधीच भरून निघू शकणार नाही….. म्हणून एकमेकांना मायेची हाक द्या, प्रेमाची साथ द्या. जीवन क्षणभंगूर आहे जगण्याचा आनंद घ्या…. . ❣ आवडल्यास आपल्या बायकोला किंवा नवऱ्याला टॅग करा.... आणि लग्नच नसेल झालं तर वाचून आनंद घ्या कारण तुम्हाला हे दिवस पण येणारच आहेत ना..... 😂😂😂😂😂😂 #👫नवरा बायको / सासू सून
72.3k जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post