तुमची भाषा बदला
Tap the Share button in Safari's menu bar
Tap the Add to Home Screen icon to install app
ShareChat
#हरीपाठ अभंग क्र.१०) त्रिवेणी संगमीं नाना तीर्थें भ्रमीं! चित्त नाही नामीं तरी ते व्यर्थ!! नामासी विन्मुख तो नर पापिया! हरीविण धांवयां न पावे कोणी!! पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक! नामे तिन्हीं लोक उद्धरती!! ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचे! परंपरा त्याचे कुळ शुध्द!! त्रिवेणी संगम म्हणजे आपल्या पवित्र मानल्या गेलेल्या गंगा,यमुना,सरस्वती या तीन नद्यांचा संगम! येथे स्नान केले तर पाप जळून जाते असा समज आहे.पापक्षालन व पुण्यप्राप्तीसाठी तीर्थयात्रा कराव्यात असे धर्मशास्त्र सांगते पण ज्ञानदेव म्हणतात तुम्ही कितीही तीर्थयात्रा करा अगर प्रयागास जा पण जर तुम्ही हरीनाम घेत नसाल तर सगळे व्यर्थ आहे. देवदर्शनाला गेल्यावर आपल्याला तिथे काय दृष्य नजरेस पडते? ओळीत उभे राहिले तर गप्पा कसल्या? अरे तो सिनेमा पाहिला का? हीरो काय डॅशिंग आहे! किंवा महीलावर्ग ' अगं काय सांगू सासूला काही पटतच नाही.सारखी कटकट चालू' किंवा त्या पवार बाईची साडी पाहीली का? ४ हजाराची आहे म्हणते.तुला वाटली तेवढी किंमती? नाही वाटत, उगाच मोठेपणा सांगत असते ती. या किंवा अशाच गप्पा! अरे देवदर्शनाला आलाय ना! आत जाण्यापूर्वी मन तल्लीन व्हावे म्हणून रांगेत उभे राहण्याची संधी दिलीय त्याने असा विचार करून त्याचे नाम घेत राहीलात तर आत दर्शनासाठी गेलात तर समाधान मिळेल.इथे कुणाचे दोष दाखवणे हा उद्देश नाही,पण मग आत दर्शन एखादं मिनिटांत उरकते.किती लाभ होईल अशा दर्शनाने?आपल्या दैवताच्या दर्शनाने समाधान मिळते पण प्रगतीसाठी तेवढेच पुरेसे नाही, त्याऐवजी नामसाधनेत रहा.आणि एकदा नामाची गोडी लागली की हे तीर्थस्थान,तीर्थयात्रा हे सगळे सोडून नामाचे महत्व कळून येईल. जो मनुष्य हरीनाम घेत नाही तो पापी होय असे महाराज म्हणतात.नाम घेतल्याने अनंत जन्माचे पातक जळून जाते.नाम न घेता सगुणरूपातील भगवंताची पूजाअर्चा केली तर तुझ्यात काहीच बदल होणार नाही.म्हणजे जैसे थे! आपण अनेक उदाहरणे पहातो.सतत देवदर्शनाला जातात पण त्यांचा त्यांच्या षडरिपुंवर पण ताबा नसतो.कारण स्थूलदेहाने फक्त दर्शन घडते.तेही भक्तीभावाने घेतले तर! किती वेळ त्या भगवंतासमोर उभे असतो आपण? सतत तर मूर्तीसमोर उभे राहू शकत नाही.नामाने मनावर चित्तावर परिणाम होतो व बदल घडू लागतो.नाम आपण सदासर्वकाळ कुठे ही कुठल्याही स्थितीत घेऊ शकतो.बसता उठता,खाता पिता,हिंडता फिरता, त्यामुळे हळूहळू नामाशी जवळीक होऊ लागते व षडरिपुंपासून दुरी वाढू लागते पण नामाचा संस्कारच झाला नाही अशा मनुष्याच्या सुटकेसाठी प्रत्यक्ष भगवंतांनाच धाव घ्यावी लागते तरच त्याची पापातून सुटका होईल. एक दुराचारी म्हणून ओळखला जाणारा वाल्या कोळी यांना आपण आज वाल्मिकी ऋषी म्हणून वंदन करतो.त्यांचे हे परिवर्तन फक्त नामानेच झालेय. भगवंताच्या नामाने पातकांपासून त्रेलोक्याचा उद्धार होतो असे वाल्मिकींनी रामायणात सांगितले आहे.म्हणजे नाम किती आवश्यक आहे! ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की,हरीनामाचे जो भजन करतो त्याच्या सर्व वंशाचा उद्धार होतो.वंश म्हणजे पुत्र,कन्या पौत्र, बंधू भगिनी व आप्त. जो श्रेष्ठ भक्त असतो तो स्वत: चा उद्धार करतोच पण त्याच्याशी सहमत असणारे त्याचे सर्व कुळसुद्धा पापमुक्त होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल, एकादशीला जातोच आम्ही भजनाला.कधीच चुकवत नाही.म्हणजे आमचा उद्धार होणार!कायम त्याच्या संगतीत रहा.असे हरीनाम भजत राहीलास तरच चित्तावरचे संस्कार नाश पावणार आहेत आणि मुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल सुरू होईल. आपण ही म्हण ऐकतो बाप से बेटा सवाई! मग आपले जर हरीनामाचे संस्कार पूर्ण कुटुंबावर झाले तर पूर्ण कुटुंब त्याच मार्गाने वाटचाल करू लागते व नि: संशय त्यांचीही मुक्तीच्या दिशेने पावले पडू लागतात. इथे महाराजांना सांगायचे आहे की,नित्य मुखी नाम असू दे.सदा हरीला भज.तरच हे होणार आहे.वाल्याचा वाल्मिकी झाला तसे स्वत:त परिवर्तन घडवलेस तर आपल्यासह आप्तांचीही पापातून सुटका करशील. सौ.हेमा पाटील. जय जय रामकृष्ण हरी!! #🙏स्वामी समर्थ
#

🙏स्वामी समर्थ

🙏स्वामी समर्थ - SA GO AN Dua Vivo V11 Al Dual Camera 2019 . 12 . 08 10 : 45 - ShareChat
176 जणांनी पाहिले
2 तासांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post